TVF First Marathi Movie Bayangi Amey Wagh : टीव्हीएफ म्हणजेच द व्हायरल फिव्हर आता मराठी सिनेसृष्टीत धमाकेदार एंट्री करत आहे. अलौकिक लोककथेवर आधारित ‘बायंगी : पाळायची नाही टाळायची!’ या धमाकेदार चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. टीव्हीएफच्या या पहिल्या वहिल्या मराठी प्रोजेक्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आपल्या क्रिएटिव्ह कंटेंटमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी टीव्हीफ आता मराठी माणसाची मनं जिंकायला सज्ज झालीय. टीव्हीफने आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. दमदार विषय आणि जबरदस्त कलाकारांना घेऊन ते ‘बायंगी: पाळायची नाही टाळायची!’ नावाचा धमाकेदार चित्रपट लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत.
बायंगीमधील कलाकार
अलौकिक लोककथांच्या जगातून एक रंजक कथा आपल्यासमोर अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा टीव्हीफचा प्रयत्न आहे. या चित्रपटां दिग्दर्शन गुल्लक सीझन ५ चे दिग्दर्शक अभय राऊत यांनी केलं आहे. तर बायंगीमध्ये अमेय वाघ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर हार्दिक जोशी, मनमीत पेम आणि अविनाश खेडेकर यांच्या भूमिका देखील पाहायला मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांत टीव्हीएफने सातत्याने प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे, जवळचे वाटणारे आणि प्रभावी आशयाचे वेब शो दिलेले आहेत. २०२६ मध्ये टीव्हीएफचे आतापर्यंत ९ शो प्रदर्शित झाले असून त्यामध्ये सोनी लिव्ह वरील गुल्लक सीझन ५, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वरील सप्ने व्हर्सेस एव्हरीवन सीझन २ आणि अॅस्पिरंट्स सीझन ३, नेटफ्लिक्स वरील हॅलो बच्चो सीझन १ तसेच जिओहॉटस्टार वरील स्पेस जेन : चांद्रयान सीझन १ यांचा समावेश आहे.प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स या कार्यक्रमात टीव्हीएफने ‘वन’आणि ‘कॉलेज फेस्ट’ यांसारख्या चित्रपटांची घोषणा केली.
टीव्हीएफच्या गाजलेल्या सीरिज
टीव्हीएफच्या गाजलेल्या कार्यक्रमांमध्ये पंचायत, गुल्लक, कोटा फॅक्टरी, अॅस्पिरंट्स, टीव्हीएफ पिचर्स, ये मेरी फॅमिली, क्युबिकल्स आणि पर्मनंट रूममेट्स यांचा समावेश आहे.
