Varsha Usgaonkar Kishori Shahane Ganpati Dance Reel: सिनेविश्वाचा एक काळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांनी एकत्रित येत गणेशोत्सव साजरा केला. दोघींनी गणरायासमोर रील केली असून, ती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. वर्षा व किशोरी शहाणे यांना एकत्रित पाहून मराठी प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
वर्षा उसगांवकर व किशोरी शहाणे यांनी घरच्या गणपतीसमोर खास आगरी कोळी गाण्यावर रील केली आहे. सध्या सोशल मीडियावर ‘कौलारू माडी गं’ गाणे ट्रेडिंगवर आहे. या गाण्यावर वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे व अर्चना नेवरेकर यांनी रील केली. व्हिडीओमध्ये किशोरी शहाणे, वर्षा उसगांवकर व अर्चना नेवरेकर या पारंपरिक साडी आणि दागिन्यांनी नटलेल्या दिसत आहेत. गणरायासमोर तिघींनी ‘कौलारू माडी गं’ गाण्यावर डान्स केला आहे.
वर्षा उसगांवकर व किशोरी शहाणे यांची खास रील
किशोरी शहाणे या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असून, त्या अनेकदा आपल्या मुलासह रील शेअर करत असतात. आता त्यांनी वर्षा उसगांवकर व अर्चना नेवरेकर यांच्याबरोबर गणेशोत्सवातील खास क्षण शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिघींनी पारंपरिक वेशात केलेलं नृत्य पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’ असे कॅप्शन लिहीत तिघींनी आनंदाने गणेशोत्सव साजरा केला आाहे.
तिघींच्या या रीलवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्यावर एका नेटकऱ्याने लिहिले की, वर्षाताई खूप छान. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, सुंदर आरास आणि सुंदर मुर्ती आहे. त्यावर रेड हार्ट इमोजी कमेंट्स करीत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिघींचे कौतुक केले. अभिनेत्रींचा हा साधा, पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
दरम्यान, वर्षा उसगांवकर व किशोरी शहाणे या दोघीही मराठी बिग बॉसमध्ये झळकल्या होत्या. किशोरी शहाणे दुसऱ्या सीझनमध्ये, तर वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या.
