बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने आजवर अनेक चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयनाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठमोळ्या रितेशने लई भारी चित्रपटातून मराठीत पदार्पण केले. आता तो पुन्हा एक नवा मराठी चित्रपट घेऊन येत आहे, ज्याची चर्चा सगळीकडे आहे. तो चित्रपट म्हणजे ‘वेड’, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. प्रमोशन दरम्यानचा रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश गेला असताना एका चाहतीने त्याची स्वाक्षरी घेतली तसेच तिने काही रितेश आणि जिनिलिया डिसुझाची काही चित्र काढली होती. रितेशला बघताच त्या चाहतीला अश्रू अनावर झाले. रितेशने तिचे आभार मानलेच त्याचबरोबबरीने तिच्या बरोबर डान्सदेखील केला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ved actor ritiesh deshmukh while promotion his film one fan gets emotional spg
First published on: 03-12-2022 at 17:29 IST