ved teaser release riteish deshmukh genelia deshmukh watch video | Ved Teaser : "...तर काही प्रेमातलं वेड होतात" रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर! | Loksatta

Ved Teaser : “…तर काही प्रेमातलं वेड होतात” रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर!

रितेश देशमुख- जिनिलीयाच्या ‘वेड’चा टीझर प्रदर्शित

Ved Teaser : “…तर काही प्रेमातलं वेड होतात” रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर!
३० डिसेंबर रोजी त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मागच्या काही काळापासून सतत्याने त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत रितेश आणि जिनिलीयाने या चित्रपटाची माहिती दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यात आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’च्या टीझरच्या सुरुवातीला रितेश देशमुख प्रेमाबद्दल बोलताना दिसतो. जोरदार कोसळणाऱ्या पावसात फायटिंग करत असलेल्या रितेशच्या चेहऱ्यावर काहीसे रागाचे आणि व्याकूळ भाव आहेत. अशातच त्याच जिनिलीयाची एंट्री होते. सिगारेटचे झुरके घेत भर पावसात जिनिलीयासमोरून जाणार रितेश सर्वांची उत्कंठा वाढवतो. याशिवाय या टीझरमध्ये रितेशचा “प्रेम असतं प्रेमासारखंच, काही वेड्यासारखं प्रेम करतात तर काही प्रेमातलं वेड होतात” हा संवाद मनाचा ठाव घेतो.

पाहा टीझर

रितेश देशमुखच्या या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही त्याच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. अक्षयलाही हा टीझर प्रचंड आवडला असून त्याने त्याच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवरून शेअरही केला आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . ३० डिसेंबरला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा- रितेश देशमुखच्या अडचणीत वाढ, ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचे पोस्टर कॉपी केल्याचा गंभीर आरोप

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. जिनिलिया देशमुख या चित्रपटाची निर्माती आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 14:29 IST
Next Story
अंतर्वस्त्र, टॉवेल गुंडाळत मानसी नाईकच्या नवऱ्याने केलं होतं न्यूड फोटोशूट, व्हायरल फोटोंमुळे होता चर्चेत