दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. तर प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. पण आता या चित्रपटाबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. महेश मांजरेकर यांनी स्वत:चा मुलगा सत्य मांजरेकरला या चित्रपटातून काढून टाकल्याचे बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात सत्य मांजरेकर हा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार होता. या चित्रपटाच्या लाँचवेळी त्याची झलकही दाखवण्यात आली होती. पण त्यानंतर अनेकांनी सत्यबद्दल आक्षेप नोंदवला होता. काही शिवप्रेमींनी त्याच्यावर सडकून टीकादेखील केली होती. सत्य मांजरेकर छत्रपतींचा मावळा म्हणून शोभत नाही त्याला ही भूमिका देऊ नये, अशा शब्दात अनेकांनी टीका केली होती. या विरोधामुळे महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलाला या भूमिकेतून काढून टाकल्याचं बोललं जात आहे.
आणखी वाचा : “मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही कलाकार मंडळी जिममध्ये वर्कआउट करताना दिसली होती. यात सत्या मांजरेकर कुठेच वर्कआउट करताना दिसला नाही. त्यामुळेच या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अभिनेता आरोह वेलणकर नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने ‘टीम वर्क’ असे म्हणत सर्व कलाकारांचे जीम करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यात सत्य मांजरेकर हा कुठेच दिसत नव्हता. तर दुसरीकडे आरोह हा जीम करताना दिसत होता. हा व्हिडीओ पाहून सत्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा : “मी कोणालाही घेतलं…” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करण्याबद्दल महेश मांजरेकर स्पष्ट बोलले

त्याला या भूमिकेतून काढण्यात आल्याची चर्चा देखील रंगताना दिसत आहे. तसेच दुसरीकडे आरोह वेलणकर हा सत्य मांजरेकर साकारणार असलेल्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या चित्रपटात आरोह वेलणकरची वर्णी खरंच लागली आहे का हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vedat marathe veer daudale saat mahesh manjrekar son satya manjrekar exit from movie gym video get viral nrp
First published on: 18-03-2023 at 10:03 IST