अलीकडच्या काळात सोशल मीडियावर कोणत्या गोष्टीचा ट्रेंड सुरू होईल याचा काही नेम नाहीये. गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यासह पावसामुळे जनजीवन कशाप्रकारे विस्कळीत झालंय याचेही व्हिडीओ समोर येत आहेत. मात्र, याचबरोबर आणखी एका गोष्टीची सर्वत्र चर्चा रंगलीये. अनेक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसह नेटकऱ्यांनी ओल्ड मॉन्क ही रम आउट ऑफ स्टॉक झाल्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

ओल्ड मॉन्क ही रम मुंबईत बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नाहीये असा दावा या व्हायरल व्हिडीओमधून करण्यात येत आहे. याचसंदर्भात आता लोकप्रिय मराठी अभिनेते विद्याधर जोशींनी सुद्धा पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. “मला मान्य आहे की सध्या खूप गंभीर प्रश्न आजूबाजूला आहेत. पण, काही असेही प्रश्न पडतात” हे त्यांनी आवर्जून या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

अभिनेते विद्याधर जोशींची पोस्ट

( मला मान्य आहे की सध्या खूप गंभीर प्रश्न आजूबाजूला आहेत. पण, काही प्रश्न पडतात त्याला काही करता येत नाही. )
गेले काही दिवस बाजारामध्ये Old Monk चा स्टॉकच नाहीये. बार मध्ये सुद्धा मिळत नाहीये. क्लबमध्ये सुद्धा Old Monk मिळत नाहीये!! काय प्रॉब्लेम काय झालाय? त्यात हा पाऊस असा!

vidyadhar joshi post
अभिनेते विद्याधर जोशींची पोस्ट

विद्याधर जोशींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. “मला Wine शॉप वाल्याने सांगितलं आता Old Monk बंद झाली…मी अजूनही धक्क्यात आहे”, “बाप्पा तुम्हाला आणून देऊ का?”, “समदु:खी”, “खूप मोठा प्रश्न आहे”, “बाप्पा आमच्याकडे या”, “ब्लिंकइट करा”, “आपलं दु:ख सारखंच आहे…” अशा असंख्य कमेंट्स अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवर आल्या आहेत.

vidyadhar joshi post netizens comments
अभिनेते विद्याधर जोशींच्या पोस्टवरील कमेंट्स

दरम्यान, विद्याधर जोशींनी इंडस्ट्रीत बाप्पा जोशी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांच्या विविध सोशल मीडिया पोस्ट चाहत्यांचं नेहमीच लक्ष वेधून घेतात. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतेच ते पूजा सावंतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दृश्य-अदृश्य’ सिनेमात झळकले आहेत.