Viju Mane daughter Gojiri ICSE 10th Result: नुकताच आयसीएसई (ICSE) बोर्डाचा निकाल लागला. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे यश साजरे केले आहे. सोशल मीडियावर जल्लोषाच्या अनेक रील्स पाहायला मिळत आहेत. या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आता लोकप्रिय मराठी दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी एक कार्टून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलीच्या हातात दहावीचा निकाल लागल्याचा कागद असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना विजू माने यांनी लिहिले, “तिने करून दाखवलं. गोजिरीला खूप जास्त मार्क मिळालेत. ९५.६ टक्के तिला मिळाले आहेत. तिची मेहनत आणि तुमच्या शुभेच्छांमुळे हे शक्य झाले आहे”, असे म्हणत विजू माने यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विजू माने यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत विजू माने यांच्या लेकीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हेमांगी कवीने कमेंट करत लिहिले, “अभिनंदन, कमाल”, कुशल बद्रिकेने इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. गायिका वैशाली सामंतने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. याबरोबरच, सुकन्या मोने यांनीदेखील कमेंट करत गोजिरीचे कौतुक केले आहे.

नेटकरी म्हणाले…

एका चाहत्याने लिहिले, “गोजिरीला भविष्यासाठी शुभेच्छा”, दुसऱ्याने लिहिले, “गोजिरी तुझा अभिमान आहे, अभिनंदन”, आणखी एकाने लिहिले, “मन:पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप प्रेम”, एकाने लिहिले, “कुशल काका, अभिजीत काका, संतोष काका आणि गोजिरीच्या बाबांचे एकत्रित करूनही गोजिरीचे 15.6% जास्ती भरलेत. मनपूर्वक शुभेच्छा, एकाने लिहिले, ” गोजिरी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

विजू माने यांच्याबद्दल बोलायचे तर ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘प्रभो शिवाजी राजा’, ‘रेगे’, ‘गोजिरी’, ‘ती रात्र’, ‘बायोस्कोप’, ‘खेळ मांडला’, ‘शर्यत’, ‘शिकारी’, ‘पांडू’ असे विविध विषय आणि आशय असलेल्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, विजू माने अनेकदा विनोदी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टना चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.