scorecardresearch

Premium

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित, पोस्टर रिलीज

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं नुकतंच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं.

vikram gokhale

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं नुकतंच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांची महत्वपूर्ण भूमिका असणारा ‘गोदावरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. असतानाच त्यांच्या आणखी एका आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

आणखी वाचा : अथांग समुद्र, रोमान्स आणि वेड्यासारखं प्रेम; चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

paresh mokashi
“तो वेडा आहेच, पण…” परेश मोकाशींच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “आम्ही नवरा-बायको…”
Hardeek joshii
हार्दिक जोशीसाठी वाढदिवस ठरला अविस्मरणीय, अभिनेत्याला मिळाली ‘ही’ खास भेट
Late actor Dilip Kumar younger sister Saeeda Khan passed away
दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची धाकटी बहीण सईदा यांचे निधन
mrunmayee-deshpande
सुभेदार चित्रपटानंतर मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरीजमध्ये एन्ट्री; पोस्टर प्रदर्शित

‘सूर लागू दे’ असं या चित्रपटचं नाव आहे. आज या चित्रपटाच्या टीमने सोशल मिडीयावरून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विक्रम गोखले दिसत आहेत. हा समाज प्रबोधन करणारा एक कौटुंबिक चित्रपट असणार असल्याचं समोर येत आहे. विक्रम गोखले यांच्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

हेही वाचा : “नाटकाच्या प्रयोगाला ४० मिनिटं आधी…”; शशांक केतकरने विक्रम गोखलेंबरोबरच्या आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

प्रवीण बिरजे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिषेक कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी केली आहे. या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे. तर या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाहीये. पण लवकरच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विक्रम गोखले यांना प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vikram gokhales last film will be releasing soon poster got released rnv

First published on: 29-11-2022 at 16:48 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×