Vinesh Phogat Disqualified in Paris Olympics 2024 : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार अलीकडच्या काळात सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत आहेत. सध्या सर्वत्र पॅरिस ऑलिम्पिकची चर्चा चालू आहे. विनेश फोगटने गेल्या वर्षभरात वैयक्तिक आयुष्यात मोठा संघर्ष केल्यानंतर महिलांच्या कुस्तीत ५० किलो वजनी गटातून अंतिम फेरीत धडक मारली होती. यानंतर संपूर्ण देशभरातून विनेशवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत होता. याशिवाय भारताचं चौथं पदक सुद्धा निश्चित झालं होतं. परंतु, सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना विनेश अपात्र ठरल्याची धक्कादायक बातमी समोर आली. यासंदर्भात आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी विनेश फोगाट अपात्र झाल्याने दु:ख व्यक्त केलं आहे. मराठी अभिनेता आस्ताद काळेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत या कुस्तीपटूला पाठिंबा दिला आहे. अभिनेता लिहितो, "मला खात्री आहे की यात कोणीही बेपर्वा नव्हतं. ना सपोर्ट स्टाफ, ना खेळाडू…मला खरंच खात्री आहे की, ही फक्त एक प्रामाणिक चूक होती. भारताने एक पदक निश्चितपणे गमावलंय…विनेश ही स्पर्धा हरली पण, तिने या क्रीडा जगतात मिळवलेला सन्मान, देशात मिळवलेला आदर ती कधीही गमावणार नाही." हेही वाचा : Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, भारताला सर्वात मोठा धक्का आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत ( Vinesh Phogat ) मराठी कलाविश्वात नाराजी आस्तादप्रमाणे आणखी काही मराठी कलाकारांनी सुद्धा विनेशबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमेने विनेश अपात्र झाल्याची बातमी शेअर करत "absolutely heartbroken." असं म्हटलं आहे. तर, 'बिग बॉस' फेम अभिनेता उत्कर्ष शिंदेने "वाघीण जोमात - विरोधक कोमात" अशी मोजक्या शब्दांची पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय अभिनेता अभिजीत केळकरने "तुझं अपात्र होणं, जिव्हारी लागलंय" अशी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा : Vinesh Phogat : “अर्धा ग्लास पाणी प्यायलात तरी वजन वाढतं, अंघोळसुद्धा…”, विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हिंदकेसरी काय म्हणाले? हेमंत ढोमेची प्रतिक्रिया ( Vinesh Phogat ) https://www.instagram.com/p/C-XFq2jtEwk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== हेही वाचा : विश्लेषण : ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी विनेश फोगट अपात्र कशी ठरली? मराठी कलाकारांप्रमाणे बॉलीवूड कलाविश्वातून सुद्धा विनेश फोगाट अपात्र झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, विनेशचं वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. आता स्पर्धेच्या नियमांनुसार विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही. त्यामुळेच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.