scorecardresearch

Video: भूताने पछाडलेल्या हॉटेलमधून कसे बाहेर पडणार आशय-सोनाली? बहुप्रतीक्षित ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा असा हा ट्रेलर आहे.

Video: भूताने पछाडलेल्या हॉटेलमधून कसे बाहेर पडणार आशय-सोनाली? बहुप्रतीक्षित ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

निर्माता आनंद पंडित, रूपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘व्हिक्टोरिया’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या कलाकारांचा फर्स्टलूक समोर आला होता. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा आणखीन वाढवण्यासाठी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. विराजस आणि जीत अशोक यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा असा हा ट्रेलर आहे.

आणखी वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव

या ट्रेलरची सुरुवात युकेमधील ‘व्हिक्टोरिया’ नावाच्या एका आलिशान हॉटेल पासून होते. हॉटेलमध्ये रेणुका नावाच्या एका स्त्रीचा मृत्यू झालेला असतो. सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे दोघे हॉटेलमध्ये राहायला जातात आणि या कथेतील थरार सुरू होतो. ती दोघं या हॉटेलच्या प्रतिबंधित जागेत जाण्याचा प्रयत्न करतात पण तेवढ्यात पुष्कर जोक त्यांना आडवतो. तेव्हापासून सोनालीला त्या हॉटेलमध्ये रेणुकाचे भूत दिसायला लागतं. ती दोघे हॉटेलमधून कशी बाहेर पडणार आणि त्या भूताचं पुढे काय होणार हे हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

हेही वाचा : “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग तसेच आशय कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:25 IST

संबंधित बातम्या