when mahesh director manjrekar is eager to launch amit thackrey in marathi film spg 93 | अमित ठाकरेंना महेश मांजरेकर चित्रपटातून 'या' करणार होते लाँच; राज ठाकरे म्हणाले, "बाप बेटे दोघे.. " | Loksatta

अमित ठाकरेंना महेश मांजरेकर ‘या’ चित्रपटातून करणार होते लाँच; राज ठाकरे म्हणाले, “बाप बेटे दोघे… “

कारण बाप बाहेर तेच बोलतो मुलगादेखील तेच बोलतो हे बरे दिसत नाही.

अमित ठाकरेंना महेश मांजरेकर ‘या’ चित्रपटातून करणार होते लाँच; राज ठाकरे म्हणाले, “बाप बेटे दोघे… “
politician

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. पक्षबांधणीसाठी ते महाराष्ट्रात फिरत आहेत. गावागावातील मनसे कार्यकर्त्यांची ते भेट घेत आहेत. नुकतंच त्यांनी एक विधान केलं आहे ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत. ते असं म्हणाले की ‘माझे वडील राजकारणात म्हणून मी राजकारणात अन्यथा राजकारणात नसतो . सध्या राजकारणातील परिस्थिती भयावह आहे’. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे यांच्या विधानाची सध्या चर्चा आहे.

अमित ठाकरे यांना चित्रपटात लाँच करण्याचा इरादा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, मात्र हे गणित काही जुळून आले नाही. खुद्द राज ठाकरे यांनी हा किस्सा सांगितला आहे. ते महेश मांजरेकर यांच्या एफयू चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात उपस्थित होते. तेव्हा ते असं म्हणाले की ‘महेश माझ्याकडे आला आणि म्हणाला मी तुमच्या मुलाला लाँच करतो’, त्यावर मी म्हणालो ‘चित्रपटाचा नाव काय आहे’? त्यावर महेशने उत्तर दिले, ‘एफयू’ , राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘मला कळेना नक्की तो चित्रपटाचं नाव सांगतो आहे की मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे, यावर महेश म्हणाला की, हे चित्रपटाचं नाव आहे. मी त्याला सांगितले यावेळी राहू दे पुढल्या वेगळी बघू, कारण बाप बाहेर तेच बोलतो मुलगादेखील तेच बोलतो हे बरे दिसत नाही. पुढच्यावेळी शुभंकरोती अशा नावाचा चित्रपट असेल तर सांग’, त्यांनी हा किस्सा सांगताच एकच हशा पिकला होता.

“चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाने मला… ” प्रार्थना बेहरेने व्यक्त केली खंत

महेश मांजरेकर यांच्या ‘एफयू’ चित्रपटात मयूरेश पेम, आकाश ठोसर, वैदेही परशुरामी स्वतः महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर या चित्रपटात होता. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. भूषण कुमार, कृष्ण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती यार महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट मैत्री, कॉलेजविश्व, प्रेम यावर बेतला होता.

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असते. अमित ठाकरे हे त्यांच्या खास लुकमुळेही चर्चेचा विषय ठरले आहेत. अमित ठाकरे उत्तम फुटबॉलही खेळतात. अमित ठाकरेंनी त्यांची मैत्रीण मिताली बोरुडेशी लग्न केलं आहे, त्यांना एक अपत्यदेखील आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2022 at 13:55 IST
Next Story
“अवघा महाराष्ट्रच भगव्याला विसरायला लागलाय..!” आगामी ‘बेभान’ चित्रपटाचा टीझर चर्चेत