scorecardresearch

Premium

“साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडणार…”, प्रवीण तरडेंकडून ‘धर्मवीर २’ची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर समोर

‘धर्मवीर २’ चित्रपटाची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर आलं समोर

dharmveer 2 announce
'धर्मवीर २' चित्रपटाची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर आलं समोर

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक मानला जातो. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता लवकरच धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच निर्माते मंगेश देसाई यांनी धर्मवीरच्या दुसर्‍या भागाची घोषणा केली आहे.

मंगेश देसाई यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात मंगेश देसाई, प्रवीण तरडे हे जेजुरीमधील खंडोबाचं दर्शन घेताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या हातात धर्मवीर २ चित्रपटाचे पहिलं पोस्टरही पाहायला मिळत आहे. यानंतर आता लवकरच धर्मवीर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा : ‘धर्मवीर २’बाबत प्रसाद ओकची खास पोस्ट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही केला उल्लेख, म्हणाला, “माझ्या आयुष्यातल्या…”

aarya ambekar sung special hindi version of swagathaanjali
कंगना रणौतच्या ‘चंद्रमुखी २’साठी मराठमोळ्या आर्या आंबेकरने गायलं आहे खास गाणं; गायिकेची पोस्ट चर्चेत
priyanka chopra nose surgery
“ती इंडस्ट्री सोडून जाणार होती”, ‘गदर’च्या दिग्दर्शकाचा प्रियांका चोप्राबद्दल मोठा खुलासा; म्हणाले, “नाकाच्या सर्जरीनंतर…”
indian thinker dr suraj yengde to play important role in hollywood br ambedkar movie
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्यक्तिरेखा हॉलीवूडपटात ; भारतीय विचारवंत डॉ. सूरज एंगडे महत्त्वाच्या भूमिकेत
dr babasaheb ambedkar Mahaparinirvana
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावर आधारित चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू होणार? प्रसाद ओकनं व्हिडीओ केला शेअर

मंगेश देसाई यांची पोस्ट

“धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजलं.

त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच…बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2… साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, लवकरच…”, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : “सरकारने ठरवलं तर टॅक्स…” प्रसाद ओकने पत्नीबरोबर शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवर भगव्या रंगावर ‘धर्मवीर २’ असे लिहिण्यात आले आहे. त्याखाली ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’ अशी टॅगलाईनही देण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहेत. तर मंगेश देसाई हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. आता या चित्रपटात कोण कोणते कलाकार झळकणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र ‘धर्मवीर २’च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Writer and director pravin tarde prasad oak dharmaveer 2 marathi movie official announcement first poster release nrp

First published on: 09-08-2023 at 09:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×