गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर एक सिनेमा येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि राज ठाकरे यांच्या सारखी वेशभूषा केलेल्या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये राज ठाकरे यांच्या सारखी वेशभूषा केलेली एक व्यक्ती दिसत होती, आणि तिथे शूटिंग सुरू असल्याचेही दिसत होते. यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. त्यानंतर याच संदर्भातील एका चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये एका तरुणाची पाठ दाखवण्यात आली होती, त्याच्या जॅकेटवर “मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा” असे लिहिलेले होते. या तरुणाची ओळख प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी ठरली होती. आता यावरून पडदा उठला आहे. ‘येक नंबर’ या सिनेमात रांगड्या व्यक्तिमत्त्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचे समोर आले आहे.

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ हा सिनेमा येत्या १० ऑक्टोबर रोजी दसऱ्याचे औचित्य साधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाशी इतके दिग्गज जोडले गेले आहेत की, चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
fussclass dabhade Hemant dhome announce new film
“खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी…”, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ अन् क्षिती जोग झळकणार एकाच चित्रपटात, पाहा पोस्टर
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
gashmeer mahajani as Vyakantadhwari Narasimha Shastri
प्राजक्ता माळीच्या सिनेमातील नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील ‘या’ मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?

हेही वाचा…नवरा माझा नवसाचा २ : ८०० कोटींचे हिरे, बाप्पाचा कौल अन्…; यंदा कोकण रेल्वेने होणार गणपतीपुळेचा प्रवास! पाहा धमाकेदार ट्रेलर

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत असून, त्याच्या देहबोलीतूनच मनातील क्रोध व्यक्त होत आहे. या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरते ती करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. यात राज ठाकरे यांच्या सदृश व्यक्तीची नजर दिसत आहे. या सगळ्यात अधिक भर घालते ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला या ‘येक नंबर’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय-अतुल यांचे धमाकेदार संगीत लाभले आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा…लाडक्या बाबाला मोठं गिफ्ट! प्रसाद ओकला मुलाने भेट दिली थेट BMW कार; मंजिरी २२ वर्षांआधीचा फोटो शेअर करत म्हणाली…

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, “या चित्रपटासाठी मला असा एक नवीन चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे धैर्यचा रांगडा लूक मला या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य वाटला. त्यानेही या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे.”

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणतात, ”प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येकाला जाते.”

हेही वाचा…‘झिम्मा २’नंतर हेमंत ढोमेचा लवकरच येणार नवा चित्रपट, अभिनेत्याने स्वतःच्या गावात अन् शेतात केलंय चित्रीकरण

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवळेकर म्हणतात, “सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशा चित्रपटाशी आम्ही जोडले गेलो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट, दर्जेदार आणि हिट चित्रपट दिले आहेत. आमची ही परंपरा या चित्रपटातही कायम राहील, याची आम्हाला खात्री आहे.”

हेही वाचा…रिअ‍ॅलिटी शोमुळे स्पर्धकांनी केल्या होत्या आत्महत्या! त्यागराज खाडिलकरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…

बहुप्रतीक्षित असलेला “येक नंबर” हा चित्रपट १० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या सोन्यासोबतच चित्रपटाचाही आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे.