scorecardresearch

Premium

“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”

या मराठी एन्फ्लुएन्सरने शिक्षक व शिक्षण पद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह, सांगितल्या वाईट आठवणी

mrunal divekar
सोशल मीडिया स्टार मृणाल दिवेकरला शाळेत मिळायची वाईट वागणूक

मृणाल दिवेकर ही लोकप्रिय मराठी सोशल मीडिया स्टार आहे. मृणालचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या मृणालने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लहान असताना तिच्याबरोबर घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला. एका ट्युशन टिचरने आपल्याला नग्न केलं होतं, असा धक्कादायक खुलासा मृणालने केला आहे.

“लाज नाही वाटत का?” करणच्या लग्नासाठी आलेल्या पाहुण्यावर चिडलेला सनी देओल; खुलासा करत म्हणाला, “घरात…”

Parineeti Chopra shared a special wedding video
Video : आकर्षक सजावट, पाहुण्यांची मांदियाळी, वरात, वरमाळा अन्..; परिणीती चोप्राने शेअर केला लग्नाचा खास व्हिडीओ
Prathamesh education
प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती झालंय हे माहितेय का? गायकाची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
rakhi sawant
Video: आता ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक; स्वतः केलं जाहीर, म्हणाली, “आलिया भट्ट आणि विद्या बालन…”
vanita kharat struggle story
“वडापाव खायला पैसे नसायचे”, ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाली, “झगमगत्या दुनियेत…”

मृणाल म्हणाली, “माझ्या एका ट्युशन टिचरने मी होमवर्क केला नव्हता म्हणून मला नग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरीत की चौथीत होते, माझं वय ९-१० वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा होमवर्क केला नव्हता म्हणून असं केलं होतं.” सोबतच मृणालने ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये तिच्या शाळेतील अनुभवही सांगितला. ती कराडच्या एका शाळेत आधी शिकायची.

आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”

“मी आधी कराडच्या एका शाळेत शिकत होते, तिथून नंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. त्यामुळे दोन्ही शाळेतला फरक मला लवकर कळला. दोन्ही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वागणुकीतला फरक कळला. मी कराडमध्ये होते तिथे मला खूप अडचणी होत्या. ते मला खूप तुच्छतेने वागवायचे. तिथले शिक्षक मारायचे, वाचता आलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमान करायचे,” असं मृणालने सांगितलं.

“तिथून मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. तिथे जी मुलं नाटक किंवा खेळात चांगली होती, त्यांचे एक वेगळे सेक्शन बनवले होते. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे जमतं ते करा, पण त्यात तुम्ही खूप चांगलं कराल याची खात्री करा, असं सांगायचे,” असं ती म्हणाली. कौशल्ये विकसित करण्यात दोन्ही ठिकाणी फरक होता. एखाद्या मुलाला लिहायला, वाचायला नाही येत पण त्याच्यात दुसरे गुण असतील तर त्यात त्याला एक्सप्लोर करायला लावणं यात आपले शिक्षक व शिक्षण पद्धती कमी पडत आहे, असं मत मृणालने मांडलं.

“लहान मुलांना सर्वांसमोर मारणं, त्यांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं या गोष्टींचे नंतर खूप आघात होतात. तणाव येतो, स्वतःवर शंका येते की मी चांगली आहे की नाही, मी हे चांगलं करतेय की नाही, लोक जज करतील का, असे विचार मनात येतात. शिक्षकांना तेव्हा याचे परिणाम माहीत नसतात, पण मुलांच्या मनावर या गोष्टींचे आघात बराच काळ राहतात,” असं मृणाल म्हणाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi content creator mrunal divekar reveals she was naked by her tution teacher hrc

First published on: 12-09-2023 at 09:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×