निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका पार पाडणारा रवी जाधव हे नाव मराठी कलाविश्वासाठी नवीन नाही. आजवर त्यांनी अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. सतत चेहऱ्यावर स्मितहास्य असणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवी जाधव यांची आई शुभांगीनी जाधव यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रवी जाधव यांनी स्वत: पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्याने दोन तारखा शेअर केल्या आहेत. “आई… १९ जुलै १९४८ – २७ मे २०२२” असे त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याच्या आईचे निधन झाल्याची बातमी कळताच अनेक चाहत्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

रवी जाधव यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे. तर काहींनी रवी जाधव यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. आईच्या निधनामुळे रवी जाधव यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

गेल्यावर्षी ९ जानेवारी २०२१ रोजी रवी जाधव यांचे वडील हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे निधन झाले होते. रवी जाधव यांचे आई वडील डोंबिवलीत वास्तव्यात होते. वडिलांच्या निधनानंतर वर्षभरातच त्यांच्या आईचे निधन झाल्याने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक

रवी जाधव यांचे वडील गिरणी कामगार होते. रवी जाधव यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरुन वारंवार आपल्या आई वाडिलांबाबत माहिती शेअर करायचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक फोटो शेअर करत आई बाबांविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. “१९८२ च्या आधी म्हणजेच गिरणी कामगारांच्या संपाच्या आधीचे दिवस असे होते. ८२ नंतर कधीही असा फोटो काढता आला नाही… असो…. महाभीषण संपात पण तग धरुन आम्हा भावंडांना आपल्या पायावर उभे करणारे हेच ते माझे ‘स्पेशल आईबाबा’!!!”, असं लिहित त्यांनी एक जुना फोटो पोस्ट केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director ravi jadhav mother shubhangini jadhav passed away share emotional post nrp
First published on: 28-05-2022 at 15:29 IST