मराठी चित्रपटात आता इतर भाषेतील चित्रपटांसारखे वेगवेगळ्या धाटणीचे विषय मांडले जात आहेत. चित्रपटगृह सुरु झाल्यापासून मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. पावनखिंड, शेर शिवराज, हंबीरराव सारख्या ऐतिहासिक चित्रपटांना देखील उत्तम यश मिळाले आहे.एकीकडे हिंदी चित्रपटांना बॉयकॉट करत आहेत तर मराठी चित्रपटांना गर्दी करत आहेत. नेहमीच्या पठडीतले चित्रपट न बनवता वेगळ्या विषयांवर चित्रपट बनवणारा दिग्दर्शक सुजय डहाके एक नवा चित्रपट घेऊन येत आहे.

शाळा, आजोबा, फुंतुर यानंतर साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर बेतलेला चित्रपट घेऊन येत आहे. आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली. त्या पोस्टमध्ये तो म्हणतोय भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि आम्ही चित्रपटाची घोषणा केल्याच्या एक वर्षानंतर, मी तुम्हाला आमच्या श्यामची आई – श्यामची आई या चित्रपटाचा पहिला देखावा किंवा टीझर पोस्टर सादर करतो. ओम भुतकर ‘साने गुरुजी’ म्हणून

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

“खूप काही सांगायचं राहून गेलं…” मावशीच्या निधनानंतर अमृता खानविलकरची भावूक पोस्ट

मुळशी पॅटर्न चित्रपटातून घराघरात पोहचलेला अभिनेता ओम भुतकर या चित्रपटात साने गुरुजींची व्यक्तीरेखा साकारत आहे. तर चित्रपटाची पटकथा सुनिल सुखटणकर यांनी लिहली आहे. अमृता अरुण राव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याआधी १९५३ साली प्रह्लाद केशव अत्रे यांनी श्यामची आई हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाने अनेक मानाचे पुरस्कार पटकावले होते.

सुजय डहाकेच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला पसंती दिली होती. आता श्यामची आई पाहण्यासाठी प्रेसखाक नक्कीच उत्सुक आहेत. ओम भुतकरचे चाहते आता त्याला वेगळ्या रूपात पाहणार असल्याने त्यांच्यात सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आहे.