marathi film hari om official trailer release today | नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणाऱ्या 'हरि- ओम'चा ट्रेलर प्रदर्शित, व्हिडीओ पाहिलात का? | Loksatta

नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणाऱ्या ‘हरि- ओम’चा ट्रेलर प्रदर्शित, व्हिडीओ पाहिलात का?

नव्या युगातील मावळ्यांची कथा असलेल्या ‘हरि- ओम’ चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे.

नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणाऱ्या ‘हरि- ओम’चा ट्रेलर प्रदर्शित, व्हिडीओ पाहिलात का?
ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट दिसत असला तरी यात हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणीही यात पाहायला मिळणार आहे.

भगवे वादळ निर्माण करणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणारा आशिष नेवाळकर, मनोज येरुणकर दिग्दर्शित ‘हरीओम’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून आपला मराठीबाणा, छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्ये जपणारा हा ‘हरि ओम’ येत्या १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि कथा हरिओम घाडगे यांची आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानणारे हे आधुनिक युगातील मावळे अन्यायाविरोधात, खोटेपणा, कायदा, सत्तेच्या गैरवापराविरोधात संघर्ष करताना दिसत आहेत. शिवप्रेम, बंधुप्रेम, आक्रमकता असणाऱ्या ‘हरी- ओम’मध्ये ध्येय गाठण्याची जिद्द दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यातील उद्दिष्ट्य ते गाठणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट दिसत असला तरी यात हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणीही यात पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा- “आलिया बेडवर…” रणबीर कपूरने केला बायकोच्या ‘या’ सवयीचा खुलासा

कोकणातील निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवणारा ‘हरीओम’ हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. निरंजन पेडगावकर, प्रशांत, अमोल कोरडे, गणेश, राहुल यांनी चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध केले असून या श्रवणीय गाण्यांना निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिले आहे. तर या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘हरिओम’च्या क्रिएटिव्ह डायरेक्टरची धुरा राज सुरवडे यांनी सांभाळली आहे.

आणखी वाचा- “मला अनुभव आहे व्हिस्कीनंतर ट्विटर…” कपिल शर्माचा चियान विक्रमला खास सल्ला

चित्रपटाचे निर्माता, कथाकार आणि अभिनेता हरिओम घाडगे म्हणतात, ” शिवरायांची तत्त्वं पाळणारा मी एक शिवप्रेमी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांची तत्त्वे तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक भावनेने मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट आवर्जून पाहावा.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आलिया बेडवर…” रणबीर कपूरने केला बायकोच्या ‘या’ सवयीचा खुलासा

संबंधित बातम्या

नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा
अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, बुलेट प्रूफ गाडी वापरत असल्याचं उघड |Salman Khan |Bulletproof car
“आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर