दिग्दर्शक विजू माने मराठी चित्रपटसृष्टीत कायम चर्चेत असतात. कविता असो किंवा चित्रपट अथवा वेबसिरीज विजू माने प्रेक्षकांना कायमच मनोरंजनाची मेजवानी देत असतात. त्यांच्या ‘स्ट्रगलर साला’ या वेबसिरीजला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले आहे. या वेबसिरीजचे नुकतेच तिसरे पर्व सुरु झाले आहे. नेटकऱ्यांचे भरभरून प्रतिसाद या वेबसिरीजला येत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘पांडू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला देखील उत्तम प्रतिसाद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता याच चित्रपटाला तब्बल १६ नामांकन मिळाली आहेत. झी कॉमेडी अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्यात त्यांना ही नामांकन मिळाली आहेत. विजू माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ते पोस्टमध्ये असं म्हणतात ‘पांडूची चोरांना पकडण्याची शक्कल आणि प्रेक्षकांना हसवण्याची कला साऱ्यांनाच भावली आणि लोकांचं पांडुवर असलेलं प्रेम हे कॉमेडी अवॉर्ड्समध्ये मिळवलेल्या १६ नामांकांनी सिद्ध झालं आहे’. अशा शब्दात त्यांनी आपले मत मांडले आहे. तसेच त्यांनी प्रेक्षकांना आवाहन केले आहे की, ‘चित्रपटाला मिळालेल्या नामांकनांना भरगोस मत द्या’, त्यासाठीची लिंक त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे.

‘कट्यार काळजात घुसली’ साठी सचिन पिळगावकर नव्हे तर ‘या’ हिंदी कलाकारांना होती पसंती, पण…

सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, लेखन, अभिनेता, अभिनेत्री, गायक, गायिका अभिनेता, गीतकार, पार्श्वसंगीत, नृत्य दिग्दर्शक अशा विभागांमध्ये नामांकन मिळाली आहेत. ‘पांडू’ चित्रपटाच्या टीमला देखील आनंद झाला आहे. ‘पांडू’ टीमने देखील मिलेल्या नामांकांवरून प्रेक्षकांना आवाहन केले आहे. पांडू चित्रपटाला झी स्टुडिओची प्रस्तुती होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यात चित्रपटाने करोडोंचा व्यवसाय केला होता.

टाळेबंदीनंतर चित्रपटगृहे उघडण्यात आली होती, त्यामुळे हळूहळू प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत होता. ‘पांडू’ प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांना देखील अनेक दिवसांनी मनोरंजन करणारा चित्रपट पहायला मिळाला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णी होते तर प्रवीण तरडे, कुशल बद्रिके प्राजक्ता माळी हे कलाकार देखील होते. चित्रपट ज्यांना पाहता आला नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट झी ५ वर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi film pandu got 16 nominations in zee talkies comedy awards spg
First published on: 17-08-2022 at 16:45 IST