उर्फी जावेद आणि चित्रा वाघ हे प्रकरण गेले काही दिवस चांगलंच गाजत आहे. त्यावर बऱ्याच लोकांनी त्यांची मतं मांडली आहेत. नुकतंच अभिनेत्री अलका कुबल यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. गेली अनेक वर्ष आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल-आठल्ये. सोशिक व आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली. अलका कुबल यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान एका पत्रकाराने उर्फी जावेदच्या पेहरावावरून अलका कुबल यांना प्रश्न विचारला. याचं उत्तर अलका कुबल यांनी दिलं, पण नंतर चित्रा वाघ यांच्याशी निगडीत असलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मात्र त्यांनी टाळलं.

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…

आणखी वाचा : Shark Tank India 2 : पाच आठवड्यात शार्क्सनी केली ४० कोटींहून अधिक गुंतवणूक; वाचा कोणत्या शार्कनी किती पैसे गुंतवले?

उर्फी जे चित्रविचत्र कपडे घालते आणि त्यामुळे जो वाद निर्माण झाला आहे याबद्दल अलका कुबल म्हणाल्या, “आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. एक अभिनेत्री म्हणून मी ज्या संस्कारात वाढले त्यामुळे मला ही गोष्ट पटणारी नाही, पण आपण कोणालाच अडवू शकत नाही, कोण कसं फिरतंय यावर आपण नियंत्रण ठेऊ शकत नाही. तिने या गोष्टीचा विचार करायला हवा. मी माझी संस्कृती जतन करायचा प्रयत्न करत आहे, पण एक प्रेक्षक म्हणून ही गोष्ट मनाला पटणारी नाही. आपण ज्या समाजात वावरतो त्याचं भान प्रत्येकाने जपलं पाहिजे.”

आजही मराठी रसिकांच्या मनात अलका कुबल यांचं स्थान पूर्वी होतं तसंच आहे. कौटुंबिक भूमिका, दैवी भूमिका यात जरी त्यांचा हातखंडा असला तरी एके काळी त्यांनी निर्माती म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि मराठी चित्रपट सर्वदूर पोहोचवण्यात मदत केली आहे. सध्या चित्रपटांपासून लांब असल्या तरी अलका कुबल या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.