आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र चित्रपट प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाच्या नावावरुन बरेच वादविवाद निर्माण झाले होते. चित्रपटाच्या नावात ‘अश्लील’ या शब्दाचा वापर केल्यामुळे अनेकांनी त्याचा विरोध केला होता. तसंच या चित्रपटामधील कॉमिक कॅरेक्टरवरुनदेखील बरीच टीका झाली होती. मात्र हे कॉमिक पॉर्न कॅरेक्टर नक्की काय आहे? किंवा चित्रपटात त्याचा समावेश का करण्यात आला हे दिग्दर्शक आलोक राजवाडे यांनी सांगितलं.




पाहा : Video : मन फकीरासाठी मृण्मयीला करावा लागला ‘हा’ त्याग
चित्रपट प्रदर्शनापूर्वी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या टीमने लोकसत्ताच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिग्दर्शकांनी चित्रपटातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यातच चित्रपटात कॉमिक पॉर्न कॅरेक्टरचं नेमकं स्थान काय आहे सांगितलं. तसंच चित्रपटाच्या नावात जरी ‘अश्लील’ या शब्दाचा वापर करण्यात आला असला तरी चित्रपटामध्ये तसं काहीच नसल्याचंही आलोकने सांगितलं.