गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘टाइमपास ३’, ‘पावनखिंड’, ‘धर्मवीर’, ‘चंद्रमुखी’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारखे विविध चित्रपट प्रदर्शित झाले. आता शुक्रवारी १९ ऑगस्टला ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘चुकीला माफी नाही’ यांसारखे अनेक सुपरहिट डायलॉग असलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दगडी चाळ २’च्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे कलाकार उपस्थित होते.

आणखी वाचा – काही वर्ष अफेअर, २५ वर्षांचा संसार अन्…; पडत्या काळात समीर चौगुलेला मिळाली पत्नीची साथ

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

‘दगडी चाळ २’ चित्रपट कसा घडला?, पडद्यामागचे किस्से याबाबत अनेक गप्पा रंगल्या. यावेळी अभिनेता अंकुश चौधरीला लालबाग-परळच्या चाळींमधील गंमती-जमती याबाबत विचारण्यात आलं. यावेळी तो अगदी खुलेपणाने बोलला. त्याचबरोबरीने त्याला बालपणापासून तो राहत असलेल्या चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अंकुशने दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं.

अंकुश म्हणाला, “मी शाळेत होतो. त्यावेळी यालाच प्रेम म्हणतात का? हे देखील मला कळत नव्हतं. मला त्यादरम्यान एक मुलगी आवडायला लागली होती. जसं मित्रांमध्ये असतं ना तुला कोणती मुलगी आवडते? तसंच मला देखील मित्रांनी विचारलं तुला कोणती मुलगी आवडते? तेव्हा मी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं.

“पाचवी इयत्ते पूर्वीची ही गोष्ट आहे. पण त्यानंतर त्या मुलीचं आणि माझं बोलणं देखील झालं नाही. पण काही वर्षानंतर तिचा अपघात झाला आणि त्यामध्येच तिचं निधन झालं. ही गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील. माझं पहिलं प्रेम म्हणजे ते असं होतं.” अंकुशच्या ही गोष्ट कायम लक्षात राहणारी आहे.