चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? अंकुश चौधरी म्हणाला, "अपघातात तिचं निधन झालं अन्..." | marathi movie daagdi chawl release soon actor ankush chaudhari talk about his first love see video | Loksatta

चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? अंकुश चौधरी म्हणाला, “अपघातात तिचं निधन झालं अन्…”

अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या पहिल्या प्रेमाबाबत खुलेपणाने सांगितलं आहे.

चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? अंकुश चौधरी म्हणाला, “अपघातात तिचं निधन झालं अन्…”
अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या पहिल्या प्रेमाबाबत खुलेपणाने सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘टाइमपास ३’, ‘पावनखिंड’, ‘धर्मवीर’, ‘चंद्रमुखी’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारखे विविध चित्रपट प्रदर्शित झाले. आता शुक्रवारी १९ ऑगस्टला ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘चुकीला माफी नाही’ यांसारखे अनेक सुपरहिट डायलॉग असलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दगडी चाळ २’च्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे कलाकार उपस्थित होते.

आणखी वाचा – काही वर्ष अफेअर, २५ वर्षांचा संसार अन्…; पडत्या काळात समीर चौगुलेला मिळाली पत्नीची साथ

‘दगडी चाळ २’ चित्रपट कसा घडला?, पडद्यामागचे किस्से याबाबत अनेक गप्पा रंगल्या. यावेळी अभिनेता अंकुश चौधरीला लालबाग-परळच्या चाळींमधील गंमती-जमती याबाबत विचारण्यात आलं. यावेळी तो अगदी खुलेपणाने बोलला. त्याचबरोबरीने त्याला बालपणापासून तो राहत असलेल्या चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अंकुशने दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं.

अंकुश म्हणाला, “मी शाळेत होतो. त्यावेळी यालाच प्रेम म्हणतात का? हे देखील मला कळत नव्हतं. मला त्यादरम्यान एक मुलगी आवडायला लागली होती. जसं मित्रांमध्ये असतं ना तुला कोणती मुलगी आवडते? तसंच मला देखील मित्रांनी विचारलं तुला कोणती मुलगी आवडते? तेव्हा मी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं.

“पाचवी इयत्ते पूर्वीची ही गोष्ट आहे. पण त्यानंतर त्या मुलीचं आणि माझं बोलणं देखील झालं नाही. पण काही वर्षानंतर तिचा अपघात झाला आणि त्यामध्येच तिचं निधन झालं. ही गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील. माझं पहिलं प्रेम म्हणजे ते असं होतं.” अंकुशच्या ही गोष्ट कायम लक्षात राहणारी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जेव्हा देशभक्तीवर प्रश्न विचारल्यावर शाहरुख खानने दिले होते सडेतोड उत्तर, म्हणाला “मी पाकिस्तान…”

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 OTT: टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री रिद्धिमा पंडितची अशी होणार एन्ट्री
‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर’च्या सेटवर परतणार?; जॅकी श्रॉफ-संगीता बिजलानी सेलिब्रिटी पाहुणे बनून येणार
सलमानचा मेहूणा आयुष शर्माने ‘कभी ईद कभी दिवाली’तून घेतला काढता पाय , हे आहे कारण
महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीवरील बायोपिकबाबत नवीन अपडेट; अनुष्का शर्माने शेअर केला फोटो

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द