patru02
मराठी चित्रपट विस्तारत वेगाने होत असून, अनेक कॉर्पोरेटस मराठी सिनेमात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे. यातच समस्त मराठी चित्रपटसृष्टीला अभिमान वाटावा अशी गोष्ट घडलीय आहे. मराठी चित्रपटाने चक्क हॉलीवूड सिनेसृष्टीला आकर्षित केलं आहे. हॉलीवूडची ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ ही नामांकित कंपनी ‘परतू’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरली आहे. गेली अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्यास असणारे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी ‘परतू’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, महाराष्ट्र व राजस्थान मध्ये नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला आणि आणि रवी भारतीय अशा दिग्गज कलाकारांच्या ‘परतू’ सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान व आमीर खान यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलेला बालकलाकार यश पांडेसुध्दा या चित्रपटात काम करत आहे. क्लार्क मॅक मिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिलेली चित्रपटाची कथा अतिशय वेगळ्या धाटणीची आहे. तर संवाद लेखन मयुर देवलचे आहे. ‘परतू’ चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला आहे.
patru01
‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ ही अमेरिकेतील नामांकित मल्टीमिडिया कंपनी असून निर्मिती, वितरण, वेब मिडिया, टेलीव्हिजन अशा विविध माध्यमांतून ही कंपनी आर्यरत आहे. नितीन अडसूळ, क्लार्क मॅक मिलिअन व डेरेल कॉक्स या तीन मित्रांनी एकत्रीत येऊन सात वर्षांपूर्वी अमेरीकेत या कंपनीची स्थापना केली. ‘परतू’ चित्रपटाआधी ‘द व्हिक्टरी एक्स्पीरियंस’, ‘मिस युटीलिटी’ याचबरोबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत पुरस्कारप्राप्त ‘प्रेअर लाइफ’, ‘कुंडलिनी’ व ‘टुगेदर फॉरेव्हर’ या चित्रपटांची अमेरीकेत यशस्वी निर्मिती केली. ‘परतू’चा सत्य घटनेवर आधारीत कथा विषय आवडल्याने त्यांनी मराठीत या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र व राजस्थान दोन राज्यात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मराठी चित्रपट बऱ्याचदा स्टुडीओमध्ये चित्रीत केला जातो, पण ‘परतू’ सिनेमासाठी कथानकाचा विचार करून, आव्हानात्मक लोकेशनवर वास्तवदर्शी चित्रीकरण करण्यात आले आहे. यासाठी राजस्थानमधील जोधपूर शहरात ६८ किमी. आत वाळवंटात चित्रीकरण करण्यात आल. चित्रपट पाहताना लोकेशनमधील वैविध्य आणि भव्यता प्रेक्षकांना नक्कीच सुखावणारी ठरणार आहे.
संजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून, संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला साजेशी संगीताची साथ दिली आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी ‘परतू’ चित्रपटाचे थीम सॉंग गायले आहे, तर ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने ‘परतू’ला पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅक मिलिअन हे काम पहात आहेत. अमेरीकेतील ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ निर्मिती संस्थेद्वारे संपूर्णतः अमेरीकन अत्याधुनिक तंत्राचा वापर करून तयार केलेला ‘परतू’ हा मराठी चित्रपट कसा असणार याची उत्सुकता एव्हाना वाढली असेल, पण त्यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याचीच वाट पहावी लागेल.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा