‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये पाहायला मिळणार गणेशोत्सवाचा उत्साह, बच्चेकंपनीने साकारली बाप्पाची मूर्ती

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या येत्या भागात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

saregamapa-lil-chapm-ganpati
(Photo_PR)

गणपत्ती बाप्पा हे सर्वांचचं लाडकं दैवत. याच लाडक्या गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चे लहानगे स्पर्धकही उत्साहात आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावरही गणरायाचं आगमन होणार आहे. विशेष म्हणजे या लहानग्या स्पर्धकांनी एकत्र येत गणपती बाप्पाची खास मूर्ती साकारली आहे. चिमुकल्या हातांनी साकारलेलं बाप्पाचं हे रुप खुपच सुंदर दिसतंय.

गाण्यांच्या सरावासोबत या स्पर्धकांनी बाप्पाची सुंदर मूर्ती घडवली आहे. १४ स्पर्धाकांनी एकत्र येत या बाप्पाची मूर्ती साकारली आहे. बाप्पाचं हे रुप लोभसवाणे दिसत आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या येत्या भागात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. यावेळी लहानगे स्पर्धक बाप्पाच्या सेवत खास गाणी सादर करताना दिसतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi saregamapa lil champs make ganpati idol kpw

ताज्या बातम्या