scorecardresearch

राणादा-पाठकबाईनंतर ‘ही’ अभिनेत्री कुटुंबियांबरोबर सप्तश्रृंगी देवीच्या चरणी; फोटो व्हायरल

नवविवाहित जोडपं हार्दिक व अक्षया यांनीदेखील देवीचं दर्शन घेतलं आहे

राणादा-पाठकबाईनंतर ‘ही’ अभिनेत्री कुटुंबियांबरोबर सप्तश्रृंगी देवीच्या चरणी; फोटो व्हायरल
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

छोट्या पडद्यावर पहिल्या भागापासून ‘राजा राणीची गं जोडी’. या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली होती. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार निखळ हास्य आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर शिवानीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. ती नुकतीच देवदर्शनाला गेली होती ज्याची चर्चा सध्या होत आहे.

शिवानी सोनार आपल्या कुटुंबीयांबरोबर नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीचं दोघांनी दर्शन घेतलं आहे. महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. सप्तश्रृंगी देवी आज अनेक कुटुंबांची आराध्यदैवत आहे.

शिवानी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने शिवानी अभिनय क्षेत्राकडे वळाली. शिवानीच्याबरोबरीने तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार आणि नवविवाहित जोडपं हार्दिक व अक्षया यांनीदेखील देवीचं दर्शन घेतलं आहे. यादरम्यानचे फोटो अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 19:04 IST

संबंधित बातम्या