मालिका हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक घरात अगदी सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री मराठी मालिकांचा बोलबाला पाहायला मिळतो. या मालिकेच्या कथा प्रत्येक घरात काही प्रमाणात मिळत्या जुळत्या ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. सासू सुनेची तीच भांडण, कट कारस्थान या सर्व गोष्टींनी एक वेगळंच स्वरुप घेतलं आहे. यामुळे अनेक वाहिन्यांचा टीआरपीही घसरला होता. मात्र आता प्रत्येक मालिका, त्याचा आशय हा वेगळा असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी मालिकांच्या बदललेल्या या स्वरुपावर नुकतंच एका कलाकाराने भाष्य केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

झी मराठीवर नुकतीच सुरू झालेली आप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मराठी मालिकांचा स्वरुप आऊट ऑफ द बॉक्स होत चाललंय असं म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “अलकाताई म्हणजे वाघीण, कोणाच्याही बापाला न घाबरणारी…” मिलिंद गवळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

अभिनेता रोहित परशुरामची इन्स्टाग्राम पोस्ट

“मी २ वर्षांपूर्वी मुंबईच्या लोखंडवालामध्ये एका चॅनलमध्ये कामाला होतो. कंटेटच काम बघायचो, तेव्हा तिथे आलेले लेखक लोक फार छान छान स्टोरी मला सांगायचे. माझी स्टोरी ही एकदम OUT OF THE BOX आहे असं जवळपास प्रत्येकजण म्हणायचा. तेव्हापासून मला OUT OF THE BOX हा शब्दप्रयोग खूपच आवडायला लागला. त्याचा अर्थ काहीतरी वेगळं…. जगावेगळं हे कळलं तेव्हा मी तो बोलण्यात वापरायला लागलो. OUT OF THE BOX असं बोललं की मला कॉनव्हेंट शाळेत पहिला नंबर आल्यासारखं वाटायला लागलं..

दिवस निघून गेले….शब्दप्रयोग विस्मरणात गेला आणि मला ही सिरियल मिळाली…अप्पी आमची कलेक्टर..!! इथे आल्यावर, शूट सुरू झाल्यावर, आशुतोष सरांना भेटल्यावर मला वाटलं की OUT OF THE BOX शब्द बनवण्याआधी तो इंग्रजी लेखक की संशोधक आशुतोष सरांशी तास-दिडतास गप्पा मारून कॉलर ताठ करून गेला असेल आणि मग जगाला हा शब्दप्रयोग बहाल करून retire झाला असेल.

असो. अप्पी आमची कलेक्टर म्हणजे OUT OF THE BOX thinking चा एक उत्तम नमुना आहे हे मी एक अभिनेता म्हणून नाही तर एक प्रेक्षक म्हणून पण तेवढ्याच ठामपणे सांगू शकतो. ह्यात दाखवला जाणारा प्रत्येक सीन हा ज्या thought process ने शूट केला जातो ती प्रोसेस म्हणजे OUT OF THE BOX हे मला कळून चुकलंय.

असाच एक सीन आज येतोय तुमच्या समोर…. तुम्ही सगळे जण ज्या scene ची आतुरतेने वाट बघत होतात तो सीन_ हो….आज अप्पी आणि शहेनशाह समोरासमोर येतायेत. हा सीन पाहिल्यावर “मराठी सीरियलचा पॅटर्न आता OUT OF THE BOX होत चाललाय बरं का” अशी तुमची प्रतिक्रिया आली तर जिंकलो आम्ही !”, असे अभिनेता रोहित परशुराम याने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मराठी टीव्ही सीरियलच्या इतिहासात…” ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान आप्पी आमची कलेक्टर ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. आप्पी आणि शेहनशाहची जोडी हिट होईल, असा अंदाज नेटकरी लावत आहे. या मालिकेत सतत आप्पीला मदत करणारा शेहनशाहा नक्की कोण आहे हे येत्या भागात कळणार आहे. शेहनशाहचा खरा चेहरा आप्पीसमोर येणार आहे. मालिकेतील या भागात शूटींग फार खास पद्धतीनं करण्यात आलं आहे. आप्पी आणि शेहनशाहची भेट अनोख्या पद्धतीनं दाखवली जाणार आहे. याच निमित्तानं रोहित परशुरामने ही खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत.