‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ आणि ‘नवरा असावा तर असा’ मालिकेचा वटपौर्णिमा विशेष भाग

‘नवरा असावा तर असा’ मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात शशांक केतकरची पत्नीसोबत हजेरी

marathi serial
'नवरा असावा तर असा' मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात शशांक केतकरची पत्नीसोबत हजेरी

‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ तसेच ‘नवरा असावा तर असा’ या कलर्स वाहिनीवरील मालिकांमध्ये वटपौर्णिमा साजरी होणार आहे. कुंकू, टिकली आणि टॅटू मालिकेत विभा, सुभद्रा, कामिनी यांच्यासोबत रमाची बहिणदेखील वटपौर्णिमेच्या पूजेत सहभागी होणार आहे. मात्र रमा तिथे पूजा करण्यासाठी न आल्याने तिला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. सात जन्म हाच नवरा मिळो आणि नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी ही पूजा करते. वडाच्या झाडाला धागा गुंडाळत त्याला प्रदक्षिणा घालून दिवसभर उपवास करत सती – सावित्रीचे हे व्रत मोठ्या भक्तीभावाने पार पाडले जाते. मालिकेत सुभद्रा, विभा, कामिनी वटपौर्णिमेची पूजा करण्यास जाणार आहेत. परंतु रमाने मात्र हे व्रत ठेवण्यास नकार दिला आहे. आता रमाचा यावर का नकार आहे, विभाचे यावर काय म्हणणे असणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दुसरीकडे ‘नवरा असावा तर असा’ या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागामध्ये शशांक केतकरने त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच प्रियांकासोबत हजेरी लावली आहे. या विशेष भागातील गप्पागोष्टींमध्ये या दोघांनीही त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. वटपौर्णिमेनिमित्त विविध खेळसुद्धा आयोजित करण्यात आले होते. शशांकला टोपलीतील फळे ओळखण्याचा टास्क दिला गेला जो त्याने यशस्वीरीत्या पार पाडला. तसेच प्रियांकाने कार्यक्रमामध्ये वटपौर्णिमेची पूजा देखील केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi serials vat purnima special episodes kunku tikli aani tattoo and navra asava tar asa

ताज्या बातम्या