Aniruddha Joshi & Amruta Fadnavis : ‘सारेगमप’, ‘सूर नवा ध्यास नवा’ या गाण्यांच्या रिअॅलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय गायक म्हणजेच अनिरुद्ध जोशी. त्याचे म्युझिक व्हिडीओ, गाणी नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. अलीकडेच ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत चाहत्यांना अनिरुद्ध जोशीच्या ठाण्यातील घराची झलक पाहायला मिळाली. संगीताचा वारसा लाभलेल्या या कुटुंबाने त्यांचं संपूर्ण घर संगीत थीमनुसार सजवलं आहे. याशिवाय अमृता फडणवीस यांनी दिवाळीच्या निमित्ताने दिलेली खास भेटवस्तू सुद्धा अनिरुद्ध व रसिका जोशी यांनी प्रेक्षकांना दाखवली आहे.
अनिरुद्ध जोशीच्या घरी लिव्हिंग रूममध्ये एक छोटासा शोभेचा लाकडी ट्रक ठेवल्याचं पाहायला मिळतं. यावर गायक म्हणाला, “मिसेस अमृता फडणवीस आणि आमचे खूप छान कौटुंबिक नातेसंबंध आहेत. त्या दर दिवाळीला आमच्या घरी आवर्जून भेटवस्तू पाठवत असतात. त्यांनीच ही भेट दिली आहे.”
पुढे, अनिरुद्धची पत्नी रसिका म्हणते, “त्यांनी दिलेली ही भेटवस्तू आमच्या घरातील थीमला…एकंदर सजावटीला इतकी फिट झालीये की, आम्हाला ही वस्तू गिफ्ट मिळालीये असं वाटत नाहीये. आम्हीच इंटिरियरमध्ये हे बनवून घेतलंय असं अनेकांना वाटतं. सो एकंदर आमच्या घरच्या इंटिरियरला हा लहानसा ट्रक मॅच झालाय. अमृताजींनी ही सुंदर भेटवस्तू दिलीये.”

अनिरुद्ध जोशी अमृता फडणवीस यांना गाणं शिकवायला देखील जात होता. काही वर्षांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याने याविषयी सांगितलं होतं.

दरम्यान, अनिरुद्धची मुलगी अवनी जोशीने मराठी मालिकांसह यशराज फिल्म्स सारख्या मोठ्या बॅनरखाली राणी मुखर्जीसह ‘मर्दानी’ या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटाच्या फ्रँचायझीमध्येही काम केलेलं आहे. सुट्टीच्या दिवशी हे जोशी कुटुंब त्यांच्या लाकडी बैठकीवर एकत्र जमत संगीताच्या मैफिलीचा मनसोक्त आनंद घेतात.
