न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर परिसरात 'मुघल-ए-आझम' चित्रपटातील "जब प्यार किया तो डरना क्या…" या आयकॉनिक गाण्यावर मुलींच्या एका कथक ग्रुपने सादरीकरण केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 'मुघल-ए-आझम : द म्युझिकल' शोच्या प्रमोशनचा हा फ्लॅश मॉब होता. १९६० मध्ये 'मुघल-ए-आझम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटावर आधारित हा म्युझिकल शो आहे. या म्युझिकल शोमधील सर्व कलाकार सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये मराठमोळी गायिका प्रियांका बर्वेने 'अनारकली'ची भूमिका साकारली आहे. हेही वाचा : मीरा राजपूतच्या ‘या’ सवयीचा शाहिद कपूरला आलाय कंटाळा; म्हणाला, “एवढी वर्ष झाली, पण…” न्यूयॉर्कमधील फ्लॅशमॉबचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रियांकाने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्रियांका लिहिते, "मी २१ वर्षांची असताना एक स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. न्यूयॉर्कमध्ये मी 'फॅंटम ऑफ ऑपेरा' हा पहिला शो पाहिला होता, तेव्हा शोमधील प्रत्येक कलाकार किती सहजतेने आपल्या कलेचे सादरीकरण करत आहे हे पाहून मी भारावून गेले. मी कधीच कल्पना केली नव्हती की, 'मुघल-ए-आझम : द म्युझिकल' या भारतातील सर्वात मोठ्या शोमध्ये मला काम करण्याची संधी मिळेल. प्रत्येक स्वप्न आज मी जगतेय." हेही वाचा : लैंगिक समानतेविषयी बोलणं आलिया भट्टला पडलं महागात; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “तुझ्या बोलण्याला…” प्रियांका पुढे लिहिते, "न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध लिंकन सेंटरमधील डेव्हिड एच कोच नाट्यगृहात आम्ही आमच्या म्युझिकल शोचे सादरीकरण केले. याहून महत्त्वाचे म्हणजे "जब प्यार किया तो डरना क्या…" या आयकॉनिक गाण्याचे सादरीकरण टाइम्स स्क्वेअर परिसरात करण्यात आले. सादरीकरण सुरू असताना या गाण्यासाठी मी पार्श्वगायन केले होते, याचा मला सर्वाधिक आनंद असून मी सर्वांची कृतज्ञ आहे." https://www.instagram.com/p/CtHZq3ftqeB/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== हेही वाचा : Video : “भाभी का ट्रेलर आया है” पापाराझींनी चिडवल्यावर सिद्धार्थ मल्होत्रा लाजला अन्…; व्हिडीओ व्हायरल दरम्यान, अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर परिसरात 'मुघल-ए-आझम'च्या फ्लॅश मॉबमध्ये मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेची पत्नी सुनयनाही सहभागी झाली आहे. 'मुघल-ए-आझम : द म्युझिकल'चे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान यांनी केले आहे.