Gauri Pawar Education: पूर्वी गाणी, नाटक, चित्रपट, आठवड्यातून ठरावीक दिवशी प्रदर्शित होणाऱ्या मालिका ही मनोरंजनाची प्रमुख साधने होती. मात्र, काळानुसार मनोरंजनाच्या साधनांमध्ये बदल होत गेला. आता वर्षभरात विविध भाषांमध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित होतात. चित्रपटांशिवाय अल्बममधील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता फक्त गाणी ऐकण्यापुरती मर्यादित नसून, त्यामधील अभिनयही पाहता येतो.
अनेकविध विषय हाताळली जाणारी नाटके प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. या सगळ्यात वेब सीरिज भर पडली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज, चित्रपट, रिअॅलिटी शो, डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म याकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे. ओटीटीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याबरोबरच सोशल मीडिया हेसुद्धा मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन बनत चालले आहे.
सोशल मीडियावर अनेक विषय असलेले व्हिडीओ, रील्स, पोस्ट शेअर केल्या जातात. त्यामध्ये आपण कमी वेळात सादर केल्या जाणाऱ्या गोष्टींद्वारे आपण मनोरंजनातून आनंद लुटू शकतो. त्यामध्ये डान्स आदी अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहता येतात. त्याबरोबरच शेती, विज्ञान, पर्यटन, विविध अन्नपदार्थ, सौंदर्यप्रसाधने अशा अनेक गोष्टींबद्दल बोलले जाते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विविध विषयांवर त्यांची मते मांडतात, मनोरंजन करतात. त्यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण होतो. त्यांची फॉलोअर्सची संख्या मोठी असते.
मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची संख्यादेखील मोठी आहे. महाराष्ट्रातील विविध प्रदेश,भाषा, अन्नपदार्थ यांच्याबद्दल तसेच प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारे हे इन्फ्लुएन्सर लोकप्रिय आहे. त्यामध्ये बिनधास्त मुलगी म्हणजेच गौरी पवारचादेखील समावेश आहे.
‘बिंधास्त मुलगी’चे शिक्षण किती?
गौरी पवार तिच्या रील्समुळे प्रचंड लोकप्रिय ठरली. तिचे व तिच्या आजीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही वेळा लोक खळखळून हसतात. तिच्या व्हिडीओंमधून रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्वही सांगितले जाते. त्यांच्या व्हिडीओंवर नेटकरी कमेंट्स करीत त्यांची मते मांडतात. अनेकदा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. तसेच, गौरी विविध लूकमधील फोटोदेखील शेअर करत असते.
सोशल मीडियावरील लोकप्रिय असलेल्या गौरीचे शिक्षण किती, हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊ…
गौरी पवारने जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याचे लिहिले होते. गौरीने लिहिले होते, “जे जे स्कूल ऑफ आर्टस हे फक्त कॉलेज नव्हतं. माझं स्वप्न होतं. प्रत्येक कलाकाराच्या मनात एकदा तरी ज्याचं नाव येतं, त्या ठिकाणी शिकण्याचं भाग्य मला मिळालं.”
पुढे तिने असेही लिहिले होते, “आज ग्रॅज्युएट होताना मन भरून आलंय. इथल्या भिंतींनी स्वप्नं पाहायला शिकवलं, रंगांनी स्वतःला ओळखायला शिकवलं आणि संघर्षातून उभं राहायला शिकवलं. जे जे फक्त एक नाव नाही, ती एका कलाकाराची भावना आहे आणि माझ्यासाठी कायमच हृदयात जपलेलं स्वप्न आहे.”
दरम्यान, यूट्यूबवर तिचे एक दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत. तसेच इन्स्टाग्रामवरही तिचे पाच दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
