‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जेठालाल अन् माधवी भाभींची एण्ट्री

‘तारक मेहता…’मधील कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये?

सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे लवकरच या शोमध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील माधवी भाभी आणि जेठालाल हजेरी लावणार आहेत.

नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. हा कार्यक्रम गेल्या अडीच वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामध्येच आता जेठालाल, माधवी भाभी, पोपटलाल हे कलाकार सहभागी होणार आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लवकरच ३०० भागांचा टप्पा गाठणार आहे. त्यामुळे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हजेरी लावणार आहेत. येत्या१७-१८ फेब्रुवारीला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi tv show maharashtrachi hasyajatra jethalal and madhavi bhabhi ssj