“हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड” प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंकडून हळहळ व्यक्त

Marathi Actor Pradeep Patwardhan Death : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे.

“हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड” प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंकडून हळहळ व्यक्त
Marathi Actor Pradeep Patwardhan Death : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजलं. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला दुःखद धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – Photos : दर महिन्याला मेकअपसाठी किती खर्च करता? अमृता फडणवीस म्हणाल्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत ट्विटरद्वारे एक पोस्ट शेअर केली. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रदीप पटवर्धन यांचा फोटो शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. फक्त कलाविश्वातीलच मंडळी नव्हे तर राजकीय विश्वातील मंडळी देखील प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे रंगभूमीवरील एक हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी ‘मोरुची मावशी’ यांसारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय ‘एक फुल चार हाफ’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘गोळा बेरीज’ अशा अनेक चित्रपटांमधून देखील भूमिका साकारल्या. त्यांच्या या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली.”

आणखी वाचा – सुष्मिता सेनचा ‘तो’ व्हिडीओ पाहून ललित मोदींना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले, “तू हॉट…”

‘मोरूची मावशी’ या नाटकाचे प्रदीप पटवर्धन यांनी दोन हजारहून अधिक प्रयोग केले होते. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातील प्रदीप पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi veteran actor pradeep patwardhan passes away due to heart attack supriya sule sahre a post see details kmd

Next Story
रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर सोनू सूदची प्रतिक्रिया, म्हणाला “लोकांच्या प्रतिक्रियांसाठी जर…”
फोटो गॅलरी