मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजलं. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला दुःखद धक्का बसला आहे. रेणूका शहाणे, हेमांगी कवी यांसारख्या अनेक मंडळींनी प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – “हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड” प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंकडून हळहळ व्यक्त

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. ई-टाईम्सशी बोलताना विजय यांनी म्हटलं की, “महाविद्यालयीन दिवसांपासून आम्ही दोघं एकत्र होतो. बँकमध्ये एकत्र काम केलं. तसेच कलाविश्वामध्येही आम्ही दोघांनी एकत्रच पदार्पण केलं. गेल्या ३८ वर्षांपासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखत आहोत. गेल्याच आठवड्यामध्ये माझं प्रदीपशी बोलणं झालं. आणि आज मी त्याच्या निधनाची बातमी ऐकत आहे.”

पुढे ते म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीने सुपरस्टार गमावला आहे. मला प्रदीप पटवर्धन यांची नेहमीच आठवण येत राहिल.” काही मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटकर यांनी एकत्र काम केलं. प्रदीप यांच्या निधनाची बातमी ऐकताच विजय पाटकर यांना दुःखद धक्का बसला आहे.

आणखी वाचा – Photos : दर महिन्याला मेकअपसाठी किती खर्च करता? अमृता फडणवीस म्हणाल्या…

राजकीय विश्वातील बऱ्याच मंडळींनी देखील ट्विटरद्वारे प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘मोरूची मावशी’ या नाटकाचे प्रदीप पटवर्धन यांनी दोन हजारहून अधिक प्रयोग केले होते. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातील प्रदीप पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला.