गेल्या बऱ्याच दिवसांपासून बहुप्रतिक्षित ‘रानबाजार’ वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. मराठीमधील ही सगळ्यात बोल्ड सीरिज असल्याचं मानलं जात आहे. या सीरिजचा टीझर, पोस्टर प्रदर्शित होताच लाखो प्रेक्षकांनी याला पसंती दर्शवली. ‘रानबाजार’च्या ट्रेलरची प्रतिक्षा प्रेक्षकांना होती. अखेरीस या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच काही मिनिटांमध्येच १० हजारपेक्षा अधिक लोकांनी हा पाहिला आहे.

या ट्रेलरची सुरुवातच प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितच्या बोल्ड लूकने होते. राजकारण, गुन्हे आणि देहविक्री करणाऱ्या महिला यांच्याभोवती फिरणारी या वेबसीरिजची कथा आहे असं या ट्रेलरमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच वेबसीरिज विश्वात सरस वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांचा वापर या ट्रेलरमध्येही करण्यात आला आहे. शिवाय तेजस्विनीचा किसिंग सीनही यामध्ये पाहायला मिळत आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
sensex jumps over 500 points nifty close at 22217
Stock Market Today: ‘निफ्टी’ नवीन उच्चांकावर स्वार; ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी मजल
Tania Sing Ends her Life
लोकप्रिय मॉडेलची आत्महत्या, शेवटच्या कॉलमुळे IPL मधला प्रसिद्ध खेळाडू अडचणीत

आणखी वाचा – Photos : भारताचा मामे खान ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर; पण ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे, वैभव मांगले, उर्मिला कानिटकर, माधुरी पवार या कलाकारांची देखील झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी तरुण कलाकार मंडळींपासून ते मराठीमधील ज्येष्ठ कलाकारांची फौज यामध्ये काम करताना दिसणार आहे. या वेबसीरिजची कथा ही सत्य घटनांवर आधारित आहे. त्यामुळे ‘रानबाजार’ प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल असं बोललं जातंय.

आणखी वाचा – VIDEO : प्रार्थना बेहरेचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, लंडनमध्ये रिल करणं पडलं महागात

संवेदनशील विषय हातळण्यात हातखंड असलेले दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच त्यांनी या वेबसीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका देखील साकारली आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित क्राईम थ्रीलर वेबसीरिजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स यांनी केली आहे. ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांना पाहता येईल.