scorecardresearch

Premium

गुरुनाथच्या ‘राधिका’ला ओळखलं का?

राणी मुखर्जीच्या मैत्रीणीच्या भूमिकेत ती झळकली होती

छाया सौजन्य- सोशल मीडिया
छाया सौजन्य- सोशल मीडिया

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे अभिनेत्री अनिता दाते घराघरात पोहोचली. या मालिकेत ती साकारत असलेली ‘राधिका गुरुनाथ सुभेदार’ ही भूमिका सध्या प्रचंड गाजतेय. सालस, साधी, घरच्यांची काळजी घेणारी, चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या नवऱ्याला सरळ मार्गावर आणणारी आणि येईल त्या प्रत्येक संकटावर मात करणारी ही ‘राधिका’ गृहिणींच्या विशेष आवडीची. इतक्या कमी वेळात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अनिताचा अनेकांनाच हेवा वाटेल.

या भूमिकेतून तिने ज्या ताकदीने ‘राधिका’ हे पात्रं रंगवलंय याची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. रंगमंचावर काम करण्याच्या अनुभवाचा अनिताला इथे बराच उपयोग झाल्याचं पाहायला मिळतंय. पण, तिच्या एका हटके भूमिकेविषयी तुम्हाला माहित आहे का? राधिकाच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अनिता ‘अय्या’ या बॉलिवूड चित्रपटात झळकली होती. राणी मुखर्जी, पृथ्वीराज सुकुमारन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटात तिने राणीच्या अतरंगी मैत्रीणीची म्हणजेच ‘मैना’ची भूमिका साकारली होती.

MNS city president Gajanan Kale
मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Esha Deol Bharat Takhtani
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा देओल-भरत तख्तानी यांच्या नात्यात आलेला दुरावा; अभिनेत्री म्हणालेली, “नवऱ्याला असं…”
loksatta analysis benefit of hemant soren s resignation to
आणखी एक बिगर भाजप मुख्यमंत्री चौकशीच्या फेऱ्यात! हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला काय फायदा? 
ED Raids Jharkhand CM Hemant Soren Delhi residence
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ईडी; हेमंत सोरेन फरार झाल्याचा भाजपचा आरोप

‘डार्क कॉमेडी’ प्रकारात मोडणारी ही भूमिका साकारणाऱ्या अनिताला सुरुवातीला अनेकांनी ओळखलंही नव्हतं. पण, त्यानंतर आपली ‘राधिका’च ‘अय्या’मधील ‘मैना’ होती हे कळलं तेव्हा प्रेक्षकही थक्क झाले. कारण तिची भूमिका होतीच तशी. ‘मैना’चं वेडसर वागणं- बोलणं, तिचा पेहराव, केशरचना, भडक मेकअप आणि एकंदर ते पात्रंच आनितासाठी नवं होतं. पण, त्यातही तिने आपल्या अभिनय कौशल्याने एक वेगळी छाप सोडली.

अनिता मालिका विश्वात बरीच नावाजली आहे. त्यातही सध्या सुरु असणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे तर तिच्याच नावाचा गाजावाजा होत असल्याचं पाहायला मिळतंय. टीआरपीच्या बाबतीतही या मालिकेने सर्वांनाच मागे टाकलं आहे. दुसऱ्या मुलीच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या आपल्या नवऱ्याला वठणीवर आणण्यासाठी ‘राधिका’ पुढे काय शक्कल लढवणार याचीच प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maza navrya chi bayko fame marathi actress anita date also known for her role in the movie aiyya

First published on: 04-10-2017 at 01:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×