“ही माझी खुर्ची आहे”, परीचा नेहाला दम; धमाल व्हिडीओ पाहिलात का?

प्रार्थना आणि परी यांचा हा व्हिडीओ फक्त १५ सेकंदाचा आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि मायरा वायकुळ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील नेहा आणि परीची केमिस्ट्री प्रेक्षकांना हवीहवीशी वाटत आहे. नुकतंच प्रार्थना बेहरेने परीसोबत एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांची ऑफस्क्रीन मस्त पाहायला मिळत आहे.

प्रार्थना बेहरेने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने मालिकेतील चित्रीकरणादरम्यानचा पडद्यामागील व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात प्रार्थना ही तिचा सीन संपवून बाजूला ठेवलेल्या खुर्च्यांवर बसण्यासाठी येते. त्यावेळी परी तिच्याजवळ येते आणि म्हणते, “थांब थांब ही तुझी खुर्ची नाही, ही माझी आहे. त्यावर परी नाव लिहिलंय,” असे तिला सांगते.

त्यानंतर परी तिला बाजूला असलेली खुर्ची तुझी आहे. असे सांगते. यानंतर प्रार्थना तिला म्हणते, “अच्छा ही तुझी खुर्ची आहे का? मग मी बाजूला बसू का?” तर त्यावर परी म्हणते ‘हो’…आणि यानंतर प्रार्थना परीला घट्ट मिठी मारते. प्रार्थना आणि परी यांचा हा व्हिडीओ फक्त १५ सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या दोघींच्या व्हिडीओवर ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी ‘किती छान’ अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने ‘तुम्ही दोघीही मायलेकी दिसता’, ‘फारच मस्त’ अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : अरे मंत्री साहेब कसे आहात आपण?; अभिजीत बिचुकलेची बिग बॉस १५च्या घरात एण्ट्री

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा म्हणजेच परी ही चिमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, अजित केळकर या कलाकारांमुळे मालिकेचा चार चांद लागले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mazhi tuzhi reshimgaath serial fame prarthana behere share new video with pari myra video viral nrp

Next Story
मलायकाच्या ‘या’ सवयीची अरबाजला येत होती चीड
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी