अमृता खानविलकरबरोबर परी दिसली हिंदी जाहिरातीत, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी spg 93 | mazi tuzi reshmath actress mayara waykul did hindi advertisnement with amruta khanvilkar | Loksatta

अमृता खानविलकरबरोबर परी दिसली हिंदी जाहिरातीत, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते

mayara waykul
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्या दोघांप्रमाणेच ‘परी’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार मायरा वायकुळ हिचेही कौतुक झाले. नुकतीच ती एका जाहिरात झळकली आहे.

परीने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिचे आज अनेक चाहते आहेत. मालिका जरी संपली असली तरी आता परी हिंदी जाहिरातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील आहे. ही जाहिरात एका चहाची विक्री करणाऱ्या कंपनीची आहे. २६ जानेवारीचे औचित्य साधून एक सैनिक आणि त्याच्या कुटुंबाची गोष्ट जाहिरातीत दाखवण्यात आली आहे. या जाहिरातीत अमृता खानविलकर आणि मायरा आई मुलीच्या भूमिकेत दिसत आहेत.

“अजूनही वेदना…” अपघातानंतर ‘तारक मेहता..’ फेम मुनमुन दत्ताने शेअर केली पोस्ट

मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. अमृताने आज आणखीन एक मोठी घोषणा केली आहे. प्रसिध्द धावपटू आणि माण तालुक्यातील मोही गावची सुकन्या ललिता बाबर यांच्या जीवनावर लवकरच एक वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. यात ललिता बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर झळकणार आहे.

मायरा सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते, तिच्या डान्स व्हिडीओला पसंती मिळते. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये तिच्या आईबरोबर दिसत असून त्या दोघी रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ या गाण्यावर थिरकल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 19:09 IST
Next Story
नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”