‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमात दिसणार दीपा, होणार दिवाळीचे धमाकेदार सेलिब्रेशन

हा धमाकेदार एपिसोड मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे.

me honar superstar, ranga majha vegala,

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. येत्या आठवड्यात म्हणजेच ३० ऑक्टोबरच्या भागात या कार्यक्रमामध्ये ‘रंग माझा वेगळा’ मालिकेची टीम खास हजेरी लावणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सेलिब्रेशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

मी होणार सुपरस्टारच्या या परिवारासोबत सेलिब्रेशन करताना आनंद द्विगुणीत झालाय अशी भावना सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी व्यक्त केली. तर दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेनेही हा दिवस अविस्मरणीय असल्याचं सांगितलं. दिवाळीचं सेलिब्रेशन कुटुंबाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे स्टार प्रवाहच्या परिवारासोबतचा हा धमाकेदार एपिसोड मनोरंजनाचा डबल धमाका असेल असं रेश्मा शिंदे म्हणाली.

रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकार या मंचावर आल्यामुळे स्पर्धकांनीही आपल्या डान्समधून या मालिकेचे रंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धकांच्या या अफलातून नृत्यकौशल्याला परिक्षकांनीही दिलखुलास दाद दिली आहे. हा विशेष भाग ३० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Me honar superstar diwali special episode avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या