scorecardresearch

अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफची अनेक वर्षांनी झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या मिनाक्षी शेषाद्रीने शेअर केला जॅकी श्रॉफबरोबरचा फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष

अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफची अनेक वर्षांनी झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
(फोटो – ट्विटरवरून साभार)

अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तिने कोणत्याच चित्रपटात काम केलेलं नाही. अशातच आता तिने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिचे को-स्टार राहिलेले जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचा आहे. मिनाक्षी व जॅकी श्रॉफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. दरम्यान, सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या मिनाक्षीने शेअर केलेल्या फोटोमुळे अनेक वर्षांनी तिच्या चाहत्यांना एकेकाळची सुपरहिट ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळाली आहे.

अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ यांची नुकतीच पुण्यातील एका कार्यक्रमात भेट झाली. अभिनेत्रीने या कार्यक्रमातील एक सुंदर फोटो ट्विटरवर तिच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. फोटोमध्ये मिनाक्षी आणि जॅकी कॅमेरासाठी पोज देताना दिसत आहेत. जॅकी श्रॉफ यांनी काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलाय. तर मिनाक्षीने पीच रंगाचा फ्लॉवर प्रिंट ड्रेस परिधान केला होता. मिनाक्षीने फोटो शेअर करत ‘हीरो की हिरोईन’ असं कॅप्शन दिलंय.

बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या मीनाक्षीने नुकतीच पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अलीकडेच ‘ETimes’ शी एका खास मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “मला चित्रपटांमध्ये परत यायचं आहे. मला पुन्हा अभिनय करायचा आहे. असं वाटतंय की काहीतरी अपूर्ण राहिलं होतं. मी यापूर्वी ज्या प्रकारचे काम केलंय, त्यामुळे मला वाटतं की मी कोणतीही भूमिका करू शकेन. त्यामुळे स्वत:ला कोणत्याही विशिष्ट प्रकारापुरतं मर्यादित ठेवणं चुकीचं ठरेल,” असं वक्तव्य तिने या मुलाखतीत केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 20:20 IST

संबंधित बातम्या