अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबतच्या नात्याबाबत मिजान जाफरीने केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून मिजान आणि नव्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

Meezaan Jafferi, Amitabh Bachchan, Navya Naveli Nanda,
‘मलाल’ या चित्रपटातून मिजानने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नव्या आणि मिजानचा २०१८मधील एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरुन ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. पण आता मिजानने यावर वक्तव्य करत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मिजानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या आई-वडिलांनी देखील नव्या विषयी विचारले असल्याचे सांगितले होते. ‘खूप दिवसांपूर्वी मला कोणीतरी नव्या विषयी विचारले होते. तेव्हा मी मलाल चित्रपटाचे प्रमोशन करत होतो. माझ्यासाठी ते थोडे धक्कादायक होते. पण खरे सांगायचे झाले तर मी आणि नव्या खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत. मला असे वाटते की माझ्यामुळे तिचे नाव अनेक ठिकाणी घेतले जात आहे आणि हे फार चुकीचे आहे’ असे मिजान म्हणाला.

आणखी वाचा : इंडियन आयडलमधील स्पर्धकांची प्रशंसा करण्यास सांगण्यात आले होते- सलीम मर्चेंट

 

View this post on Instagram

 

A post shared by Meezaan (@meezaanj)

मिजान पुढे म्हणाला की माझे वडील जावेद जाफरी यांना देखील मी नव्याला डेट करत असल्याचे वाटत होते. मला स्वत:च्या घरातच वेगळे वाटत होते. माझे आई-वडील मला वेगळ्या नजरेने पाहात होते. त्यांनी मला विचारले हे काय सुरु आहे? त्यावर उत्तर देत मी म्हणालो मला नाही माहिती हे काय सुरु आहे. मी दिवाळीच्या पार्टीसाठी जलसा येथे गेलो होतो. त्यावेळी संपूर्ण इंडस्ट्री तेथे उपस्थित होती.

‘मलाल’ या चित्रपटातून मिजानने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्य ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. ‘पद्मावत’ चित्रपटासाठी मिजानने संजय भन्साळी यांना असिस्ट केले होते. आता तो लवकरच ‘हंगामा २’ चित्रपटात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Meezaan jafferi opens up on relationship with amitabh bachchan granddaughter navya naveli nanda avb