लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरु ती चांगलीच चर्चेत आली होती. या सर्व प्रकरणानंतर बिग बॉस फेम लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगेने संताप व्यक्त केला होता. यावेळी तिने गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली आहे. त्यानंतर आता एका मुलाखतीत मेघा घाडगेने पुन्हा एकदा गौतमीवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेघा घाडगेने नुकतंच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला आताच्या लावणी कलाकारांबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी तिने गौतमी पाटीलचे नाव न घेता तिच्या लावणीबद्दल संताप व्यक्त केला आहे. यावेळी तिने इतर लावणी कलाकारांबद्दलही सांगितले आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

मेघा घाडगे काय म्हणाली?

“खरं सांगायचं तर आता मला असं वाटत नाही की मी महाराष्ट्रात राहत नाही. कारण इतक्या दिग्गज लोकांना त्यांना दाद देताना, त्यांना मोठं-मोठे पुरस्कार घेताना बघितलं आहे, त्यांचा मान सन्मान मी बघितला आहे. आता तो सर्व मानसन्मान, इतक्या वर्षांची त्यांनी जी काही लोककलेची कमाई केली आहे सगळी मातीमोल झाली आहे.

सुरेखा पुणेकर, मी काम करत होते तेवढाच काळ लोकांनी लावणी आणि लोककला पाहिली असं मला वाटतं. आताच्या मुलींनी जो व्यवसाय करुन ठेवला आहे. आम्हीही व्यावसायिक कलावंत म्हणूनच काम केले. मी व्यावसायिक लावणी कलावंतच आहे. पण त्याची एक मर्यादा आहे. मी पैसे घेऊन काम करते. माझी काही उपजात कला नाही. पण आताचे जे लावणी कलाकार किंवा लावणी कलावंत आहेत. पण ते फिल्मी लावण्या, पारंपारिक लावण्या हे सादर करतात. आताच्या पिढीला लावणी इतकी सोपी वाटू लागली आहे की वाटेल तसे घाणेरड्या पद्धतीचे हावभाव, अंगविक्षेप, विकृतीचा कळस… पाहायला मिळतो. मला हे बोलतानाही त्रास होतो”, असेही ती म्हणाली.

आणखी वाचा : “ताई पैसे देतो, नाचून दाखवा…” ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच मेघा घाडगेचा योगेशवर गंभीर आरोप

“आपल्या महाराष्ट्रातील लोक या कलेला इतकं प्रोत्साहन देतात की गणपती, दहीहंडी आणखी कोणत्याही जयंती असू दे या कार्यक्रमांना अशा मुलींना नाचवलं जातं. घागरा चोली घालून अंगप्रदर्शन करणे, लावणीत तर आता पदर घेणंच बंद झालं आहे. गळा इतका खाली असतो, केस मोकळे सोडून बिनधास्त नाचतात, कमरेखाली साडी इतकी गेलेली असते की आम्हालाच लाज वाटते. यामुळे शरमेने डोकं फोडून घ्यावं अशी परिस्थिती या क्षेत्रात झाली आहे.

सगळे लावणी कलावंत घरी बसले आहेत. त्यांच्या सुपाऱ्या बंद झाल्या आहेत. पण ते त्यांच्या कामाशी इतके प्रामाणिक आहेत की ते कोणत्याही घाणेरड्या पद्धतीचे काम करत नाही. त्यांना ती कला माहिती आहे. त्यांनी कधीही साडीचा पदर ढळू दिला नाही. आम्ही ही लोककला जपणार आणि हे काम करणार नाही. परिस्थिती खराब आहे म्हणून हा मार्ग निवडणं पटत नाही. आता लोक अजिबात लावणी बघण्यासाठी थिएटरमध्ये येणार नाहीत”, असे मेघा घाडगेने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megha ghadge comment on gautami patil lavani video nrp
First published on: 17-11-2022 at 13:28 IST