गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना, लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्यावरुन ती चर्चेत आली. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. बिग बॉस फेम लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगे यांनी फेसबुक पोस्टद्वारे गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मेघा घाडगेने गौतमी पाटीलवर संतप्त टीका केली आहे.

मेघा घाडगेचा “अहो पाव्हनं …” या नव्या लावणीचा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. “अहो पाव्हनं …” या नव्या लावणीच्या व्हिडीओची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे. तर मेघा घाडगे आणि संजय खापरे या म्युझिक व्हिडीओत प्रमुख भूमिकेत आहेत. या व्हिडीओच्या निमित्ताने तिने अनेक प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने गौतमी पाटीलवर टीका केली.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

What Devenddra Fadnavis Said?
उद्धव ठाकरेंना भाजपाची ऑफर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” ज्यादिवशी ते…”
prarthana behere tie knot of pooja sawant and siddhesh chavan
प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…
Marathi actress Pooja Sawant is not an arranged marriage but a love marriage
“आम्ही दीड वर्ष…”, पूजा सावंतने सांगितली तिची फिल्मी लव्हस्टोरी, म्हणाली…
pushkar jog share congratulation post for pooja sawant and siddhesh chavan
पूजा-सिद्धेशच्या नव्या संसाराला पुष्कर जोगने दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला, “तुम्ही दोघे…”

मेघा घाडगे काय म्हणाली?

“सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. शासनाने लावणीचे सेन्सॉर बंद केल्याने हा सर्व प्रकार घडत आहे. जर लावणीचं सेन्सॉर दिलं तर या प्रकाराला आळा बसेल. पण ते होत नाही. लावणीसाठीचं सेन्सॉर गेली पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे. ते पुन्हा सुरु करावं यासाठी आम्ही मागे लागलो आहे. सेन्सॉर नसल्याने खुलेआम आयटम साँग सुरु झाले आहेत. ते का सुरु होत याबद्दल काहीही माहिती नाही. आयटम साँग, घागरा चोलीवर नाचणं यांसारखे अनेक प्रकार मुंबईत सुरु झाले होते. पुण्याकडच्या त्या भागात तर हे प्रकार खुलेआम आणि सर्रास घडताना दिसतात. त्याठिकाणी आळा घालणचं कठीण आहे. लोकांना चित्रपटात जे दिसतंय ते प्रत्यक्ष समोर दिसत होतं. एका तिकिटावर तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात. त्यात बार बंद झालेत, डान्सबार बंद झालेत त्यामुळे खुलेआम या गोष्टी सुरु झाल्या आहेत. बालगंधर्व म्हणजे बोलण्याची स्थितीच नाही.

लोककलावंतांची एकी नाही. त्यामुळे ही समस्या आहे. एका ग्रुपने काही केलं तर त्यांना पाठिंबा कोणी देत नाही, त्याउलट त्यांना नाव ठेवली जातात. मी जेव्हा बोलायला लागले तेव्हा लोकांना हे इतकं घाण आहे हे समजलं. त्यानंतर मात्र लोक मलाच नाव ठेवायला लागली. अनेक मुली माझ्यासमोर घळाघळा रडल्या की आम्ही उपाशी मरु, पण घागरा चोली घालून नाचणार नाही. शेवटी तो वारसा आहे त्यामुळे त्याला गालबोट लागू देणार नाही. कारण ते करत असताना खंत जाणवत असते.

सध्या चार दिन की चांदनी आहे. लोकांना डिजे डान्स, दारु पिऊन धिंगाणा घालतात. लहान लहान मुलं-मुली समोर असतात, त्यांच्यासमोर अश्लील डान्स केला जातो. त्यांना त्यांच्या पिढीचंही पडलेलं नाही. त्यांना त्यांच्या मुला-बाळाचंही पडलेलं नाही. या गोष्टींचा परिणाम पुढच्या पिढीवर होतोय. या गोष्टीचा त्यांना पुढे पश्चात्ताप होणार आहे की यावर वेळीच आळा घालायला हवा होता. मुलींना डायरेक्ट येतेस का असं विचारला जातं. तोंडातून मुली पैसे घेतात, असे अनेक प्रकार घडतात. जे सरकार चालवतात किंवा जे कोणते गट आहेत ते याबद्दल बरचं काही बोलतात. यावर बंदी घालणार, असंही सुरु होतं. याबद्दल घडतं काहीच नाही, पण पुढे काहीही घडत नाही”, असे मेघा घाडगेने म्हटले.

आणखी वाचा : “ब्लाऊजचा गळा, कमरेखाली साडी अन् अंगविक्षेप…” मेघा घाडगेचा गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा हल्लाबोल

दरम्यान प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. यादरम्यान ती भावूक झाल्याचे पाहायला मिळाली.