‘बाई दोन थोबाडीत मार पण प्रवचन देऊ नकोस’, ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर भन्नाट मीम्स व्हायरल

हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल

memes on aai kuthe kay karte, aai kuthe kay karte, sanjana, arundhati,

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र ही मालिका सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मालिकेत अरूंधतीचा मायाळू आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा स्वभाव सर्वानाच आवडत असला तरी सध्या दाखवण्यात येत असलेले कथानक प्रेक्षकांना फारसा पटलेले नसल्याचे दिसत आहे. आता सोशल मीडियावर मालिकेवर काही मीम्स व्हायरल झाले आहेत. हे पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

व्हायरल होणाऱ्या या मीम्समध्ये संजना रडताना दाखवण्यात आली आहे. तसेच तिच्या या फोटो खाली बाई दोन थोबाडीत मार पण प्रवचन देऊ नकोस असे लिहिण्यात आले आहे. तर अरुंधतीच्या फोटोवर ‘घटस्फोट घेऊन चार चारदा घरी परत येणारी माणसं आहोत आम्ही’ असे लिहिण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या मीम्स तुफान व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच संजना आणि अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले. अनेक अडचणींनंतर संजना आणि अनिरुद्ध एकत्र आले आहे. अप्पांनी घराचा अर्धा हिस्सा अरुंधतीच्या नावावर केल्यामुळे अरुंधती देखील देशमुख कुटुंबीयांसोबत राहताना दिसत आहेत. संजनामुळे घरात सतत वाद होत असतात.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Memes viral on aai kuthe kay karte serial avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!