scorecardresearch

‘सिंग इज किंग’, मिकाने खरेदी केले खासगी बेट आणि…

मिका सिंग सध्या खाजगी बेटावर वेळ घालवत आहे.

‘सिंग इज किंग’, मिकाने खरेदी केले खासगी बेट आणि…

बॉलिवूड आणि पंजाबी गायक मिका सिंग हा मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीचा गायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या हटके गाण्यांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा असतात. अलीकडेच मिका सिंग ‘स्वयंवर: मिका दी वोहती’मध्ये आकांक्षा पुरी हिची लग्नासाठी निवड केल्यामुळे चर्चेत आला होता. आता मिका एका वेगळ्याच करणाने चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे मिका सिंगने एक खासगी बेट विकत घेतले आहे. मिका सिंग सध्या खाजगी बेटावर वेळ घालवत आहे.

आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान ?, चर्चांना उधाण

मिका सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो बोट चालवताना दिसत आहे. तर त्यांचे अंगरक्षक किनाऱ्यावर उभे आहेत. बोटीवर MS लिहिले आहे म्हणजेच मिका सिंग. मिका सिंग हा पहिला भारतीय गायक आहे ज्याने स्वतःचे खाजगी बेट विकत घेतले आहे. यासोबतच मिका सिंगने ७ बोटी आणि १० घोडे देखील खरेदी केले आहेत. किंग साइज लाइफ जगणारा मिका सिंग आलिशान घरे आणि वाहनांचा मालक आहे. मिका सिंगला त्याच्या स्वतःच्या मालकीच्या बेटावर पाहून चाहते त्याचे खूप खूश आहेत.

एका चाहत्याने लिहिले, “मिका पाजी, सिंग इज किंगचे आयुष्य जगणारे तुम्हीच आहात.” आणखी एका चाहत्याने त्याचे अभिनंदन केले आणि सांगितले की, “आणखी काही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आम्हाला तुमच्या खाजगी बेटाची झलक मिळू शकेल.”

हेही वाचा : Mika Singh Birthday Special : दुबईत तुरुंगवास ते राखी सावंत Kiss प्रकरण; गाण्यांपेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असणारा गायक

मिका सिंग हा एक भारतीय पॉप गायक आणि रॅपर आहे. अनेक बंगाली चित्रपटांनाही त्यांनी आवाज दिला आहे. मिका सिंग पंजाबी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध गायक आहे. मिका सिंगने ‘सिंग इज किंग’ आणि ‘जब वी मेट’सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या