मिलिंद चंपानेरकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. माया पंडित आणि डॉ. संतोषकुमार भूमकर आदींचा निवड समितीत समावेश आहे.

‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकास २०१६चा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.

सईद अख्तर मिर्झा यांच्या ‘अम्मी- लेटर टू ए डेमॉकेट्रिक मदर’ या पुस्तकाचा चंपानेरकर यांनी ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. मंगळवारी साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत चंपानेरकर यांच्या सन्मानावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. माया पंडित आणि डॉ. संतोषकुमार भूमकर आदींचा निवड समितीत समावेश आहे.

१ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतच्या काळात अनुवाद झालेल्या प्रकाशित पुस्तकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे. पन्नास हजार रुपये रोख आणि  ताम्रपदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Milind champanerkar get sahitya akademi award

ताज्या बातम्या