ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं अकाली झालेलं निधन अनेकांसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारही हळहळ व्यक्त करत आहेत. अभिनेते मिलिंद गवळी यांनीसुद्धा पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि नाना पाटेकर या जगात नसल्याची खतं व्यक्त केली. त्यांनी यासह इतरही अनेक दिग्गज कलाकारांबरोबरचे फोटो शेअर केले.
इन्स्टाग्रामवर दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, सदाशिव अमरापुरकर, विजय चव्हाण, रमेश भाटकर,रत्नाकर मतकरी, आशा भोसले यांसारख्या एक काळ गाजवलेल्या कलाकारांबरोबरचे फोटो पोस्ट करत त्यांना मोठी कॅप्शन देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी नाना पाटेकरांबरोबर काम करण्याची संधी त्यांना कधी मिळाली नसली तर त्यांचा स्पष्टवक्तेपणा, त्यांचा दमदार अभिनय याबद्दल ते ऐकून होते असं त्यांनी यामधून म्हटलं आहे.
मिलिंद गवळींनी सांगितला नाना पाटेकरांचा किस्सा
इन्स्टाग्रामवर विविध कलाकारांबरोबरचे फोटो शेअर करत मिलिंद गवळी म्हणाले, “परवा नाना पाटेकर आपल्यातून कायमचे निघून गेले. खरंतर मी नाना पाटेकरांबरोबर कधीच काम केलं नव्हतं, पण नाना पाटेकर हे माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासामध्ये टप्प्याटप्प्यावर येत राहिले, माझ्या अनेक सहकलाकारांकडून आणि इतरांकडून नाना पाटेकर यांचे किस्से ऐकायला मिळायचे ,अजित दांडेकर हे यशवंत सिनेमाचे कलादिग्दर्शक होते, सिनेमामध्ये सीन असा होता नाना पाटेकर यांना एका भ्रष्ट पोलीसाच्या घराची तोडफोड करायची होती, निर्मात्याने अजित दांडेकरला सांगितलं नाना वैसेभी सब तोडफोड करने वाला है तो सस्ता माल लेकर घर का सेट डेकोरेट करो. नाना शूटिंगसाठी सेटवर आले, सेट पाहिला, त्यांनी अजित दांडेकरला नेहमीच्या शिव्या घातल्या आणि मग त्याला विचारलं पैसे खाणाऱ्या पोलीस वाल्याच्या घरी हे असं फालतू सामान असेल का? नानाने ते शूटिंग सुरू व्हयाच्या आधीच सेट तोडून टाकला, गाडीत बसले आणि घरी निघून गेले.”
“अजित दांडेकर निर्मात्याला म्हणाला मैने आपको बोला था. मग कधीतरी नाना पाटेकर यांनी कोणाच्यातरी मुस्काटात मारल्याची बातमी कानावर यायची. नानाचा स्वभाव सनकी आहे याची मला खात्री पटली होती आणि कदाचित म्हणून मी इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करून नाना पाटेकरबरोबर काम करायला दजलो नाही, पण नाना पाटेकरांचा अभिमान नेहमी वाटायचा कारण हा एकमेव असा मराठी कलाकार होता जो हिंदीतल्या रती महारती कलाकारांना, दिग्दर्शकांना, निर्मात्यांना पुरून उरला होता. एकमेव असा कलाकार जो स्वतःच्या नियम आणि अटींवर काम करायचा. एकमेव असा कलाकार होता जो सडेतोड बोलायचा, निडर होता.”


मिलिंद गवळी या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमधून पुढे म्हणाले, “मला नाना पाटेकर कलाकार म्हणून आवडायचे पण मकरंद अनासपुरे आणि त्यांनी नाम फाउंडेशनमध्ये जे काम केलं त्यानंतर तर माणूस म्हणून फारच श्रेष्ठ झाले नाना. प्रकाश आमटे यांच्या आश्रमात डोळ्यांचे मोफत ऑपरेशन डॉक्टर लहाने करायचे त्यावेळेला नाना पाटेकर तिथे रात्र रात्र त्यांच्याबरोबर जागायचे. हे मला डॉक्टर लहान्यांनीच सांगितलं, पुण्याचे फळणीकर यांच्या आश्रमात आम्ही आई कुठे काय करतेचे कलाकार गेलो असताना त्याच वेळेला नाना पाटेकर यांचा फळणीकरांना फोन आला होता, नाना पाटेकर विचारत होते तिकडच्या आनाथ मुलांना पुरेसं धान्य आहे ना का पाठवून देऊ? ते ऐकल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर कैकपटीने वाढला. त्या दिवशीच माझ्यासाठी नाना पाटेकर महान झाले होते. त्यांना भेटायचं, त्यांच्याबरोबर काम करायचं राहून गेलं. स्मिता पाटीलनंतर नाना पाटेकर यांच्याबरोबर आपण काम केलं नाही याची मनात कायम खंत राहील.”
