मिलिंद सोमण विकतोय खास पुरुषांसाठी भांडी घासायचा साबण; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले | milind soman advertise special vim dish wash gel for men video viral on social media | Loksatta

मिलिंद सोमण विकतोय खास पुरुषांसाठी भांडी घासायचा साबण; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

या जाहिरातीतून मिलिंदने बढाई मारणाऱ्या पुरुषांना संदेश दिला आहे

मिलिंद सोमण विकतोय खास पुरुषांसाठी भांडी घासायचा साबण; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले
मिलिंद सोमण (फोटो : व्हिडिओमधून स्क्रीनशॉट)

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण हा कायम चर्चेत असतो. आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या मुलीशी लग्न असो किंवा बीचवर नग्नावस्थेत धावणं असो, मिलिंद सोमण अशा बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत असतो. याबरोबरच तो त्याच्या फिटनेससाठी जास्त ओळखला जातो. करियरच्या सुरुवातीलासुद्धा त्याने मधू सप्रेबरोबर केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे तो चर्चेत आला होता.

आता पुन्हा मिलिंद सोमण चर्चेत आला आहे, पण यावेळचं कारण ऐकून नेटकरी चांगलेच चक्रावले आहेत. मिलिंद सोमणने नुकताच त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एका जाहिरातीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंद पुरुषांसाठी बनवलेल्या विम या भांडी घासण्याच्या जेलची जाहिरात करताना दिसत आहे. मिलिंदची ही जाहिरात पाहून सगळेच चक्रावले आहे. पुरुषांसाठी खास भांडी घासायचा साबणसुद्धा असतो हे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा : दीपिकाचा हॉट बिकिनीमधील फोटो शेअर करत शाहरुख खानने दिली ‘पठाण’बद्दल मोठी अपडेट; चाहते म्हणाले…

या जाहिरातीतून मिलिंदने बढाई मारणाऱ्या पुरुषांना संदेश दिला आहे. जाहिरातीत एक मुलगा जीममध्ये घरी भांडी घासून आईला मदत करतो असं बढाई मारत सांगत असतो. तेव्हाच मिलिंद सोमण त्याला ‘विम ब्लॅक’ या नव्या डिशवॉशची माहिती देतो आणि त्याला कुत्सितपणे टोमणादेखील मारतो. ही जाहिरात सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

जाहिरात शेअर करत मिलिंद सोमणने ‘पुरुषांसाठी खास भांडी धुण्याचा साबण विम ब्लॅक’ असं लिहीत व्हिडिओ शेअर केला आहे. ही जाहिरात पाहताच बऱ्याच लोकांनी हा डिशवॉश ऑनलाइन घेण्यासाठी गर्दी केली, पण ‘विम’ कंपनीचं हे प्रॉडक्ट आउट ऑफ स्टॉक असल्याचं दाखवत आहेत. पुरुषांनी महिलांना घरकामात मदत करावी यासाठी ही शक्कल लढवल्याचं स्पष्ट होत आहे. केवळ ब्लॅक नाव दिल्याने ही गोष्ट माणसांसाठी कशी होऊ शकते यावरूनसुद्धा बऱ्याच लोकांनी मिलिंद सोमण आणि ‘विम’ कंपनीला ट्रोल केलं आहे तर काहींनी या जाहिरातीचं कौतुकही केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 14:43 IST
Next Story
‘वेड’नंतर आता जिनिलीया देशमुखची मराठी मालिकेत एंट्री; प्रोमो व्हायरल