अभिनेता मिलिंद सोमण फिटनेस फ्रिक आहे. मॉडल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. नव्वदीच्या दशकातला हा सुपरफिट हिरो आजही तितकाच लोकप्रिय आहे. मिलिंद अनेकदा मॅरेथॉनमध्ये धावत असतो. तो त्यांच्या बायको आणि आईसोबतही मॅरेथॉनमध्ये भाग घेत असतो. त्याने आयर्न मॅन स्पर्धा देखील जिंकली आहे.

मिलिंदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. निळी जीन्स, पांढरा टी-शर्ट आणि मरुन रंगाचे स्वेटशर्ट असे कपडे घालून तो मोदींना भेटायला गेला होता. ”यूनिटी रन पूर्ण झाल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भारतातील प्राचीन खेळ, आरोग्य आणि फिटनेस या माझ्या आवडत्या मुद्द्यांविषयी त्यांनाही आकर्षण आहे हे समजले. योगा आणि आयुर्वेद यांचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.” असे कॅप्शन टाकत मिलिंदने फोटो शेअर केला.
आणखी वाचा- ”मी बाळाला जवळ घेऊ शकत नव्हते…” दिया मिर्झाने सांगितला ‘त्या’ दिवसांतील भयानक अनुभव

अमृत महोत्सवाचे औचित्य साधत मिलिंद सोमणने झाशी ते लाल किल्ला धावून यूनिटी रन मॅरेथॉन करण्याचे ठरवले. त्याने १५ ऑगस्ट रोजी झाशी येथून धावायला सुरूवात केली. तेथून थेट दिल्लीपर्यंत धावत त्याचा यूनिटी रनचा प्रवास २२ ऑगस्टला समाप्त झाला. दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर तिरंगा फडकवत मिलिंदने घेतलेला प्रवास पूर्ण केला.

आणखी वाचा-अक्षय कुमारला दिला मिलिंद सोमणने पाठिंबा, म्हणाला…

युनिटी मॅरेथॉन पूर्ण झाल्यावर मिलिंदने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ‘आणि पोहचलो! झाशीचा किल्ला ते दिल्लीचा लाल किल्ला – रस्ते, महामार्ग, ऊन, पाऊस, वारा, पायाला झालेल्या जखमा, मज्जा म्हणून मी धावायचे ठरवले. या प्रवासाने मला काही गोष्टी शिकवल्या. त्या थोड्या दिवसात तुमच्यासोबत शेअर करेन.’ असे कॅप्शन असलेला व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.