बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिले तीनही सीझन हिट ठरल्यानंतर चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. यंदाच्या घरात कोणते सदस्य असणार याबाबतही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर करत आहेत. त्यांच्या खुमासदार शैलीने घरातील सदस्यांची अनेकदा ते शाळा घेताना दिसतात. नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकरांना “राजकारणातील कोणती व्यक्ती बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल”, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत महेश मांजरेकरांनी काही नेत्यांची नावे घेतली होती.

हेही वाचा >> Video : कुटुंबासह सुवर्ण मंदिरामध्ये पोहोचला अल्लू अर्जुन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरात येण्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेपण असावं लागतं असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव महेश मांजरेकरांनी घेतलं होतं. भाजपा आमदार नितेश राणे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार अमोल मिटकरी यांनाही पाहायला आवडेल असं ते म्हणाले होते. याबरोबरच शिंदे गटातील शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांची विनोदबुद्धी चांगली आहे. त्यामुळे त्यांनाही मला ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला आवडेल, असं महेश मांजरेकर म्हणाले होते.

आणखी वाचा >> महेश बाबूवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना घरात चोरीचा प्रयत्न, चोराने भिंतीवरून उडी मारली अन्…

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना याबद्दल विचारले असता ‘बिग बॉस’च्या घरात नक्कीच जायला आवडेल, असा खुलासा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले “‘बिग बॉस’च्या घरात जाण्याची संधी सगळ्यांनाच मिळत नाही. त्यामुळे मला बोलवलं तर मी नक्कीच जाईन. मी कार्यक्रमात नाटक, गाणी यामध्ये कायम सहभाग घ्यायचो. त्यामुळे मला माझ्या भूतकाळाची आठवण होते. ‘बिग बॉस’च्या घरात जाणं ही सोन्यासारखी संधी आहे. त्यामुळे अशी संधी मिळाली तर मी निश्चितच जाईन”.

हेही पाहा >> Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवालीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक, कमेंट करत म्हणाले “बॉलिवूडमध्ये एन्ट्री…”

‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबाबत गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांप्रमाणेच राजकीय नेत्यांनाही ‘बिग बॉस’ने भुरळ पाडली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister shivsena mla gulabrao patil reaction on big boss marathi season 4 kak
First published on: 30-09-2022 at 15:58 IST