scorecardresearch

“शाहिद कित्येक वेळा रात्री…”, पत्नी मीराने उघड केले बेडरुम सिक्रेट

यावेळी मीराने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. अभिनय आणि कामासोबतच शाहिद कायमच कुटुंबाला प्राधान्य देणं पसंत करतो. शाहीद आणि मीराचे लग्न ७ जुलै २०१५ मध्ये झाले होते. लग्नाच्या वेळी मीरा फक्त २१ वर्षांची होती. त्या दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्या दोघांनी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी मीराने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला.

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात करण जोहरने मीरा आणि शाहिदला कारमध्ये सेक्स केल्याबद्दल विचारले. त्यावर मीरा पटकन म्हणाली ‘हो आम्ही केला आहे.’ मीराचे हे उत्तर ऐकून शाहिदला धक्का बसला. त्याचे हावभाव पाहण्यासारखे झाले होते. मीराच्या उत्तरानंतर शाहिदने ‘हे कधी झाले’ असे विचारले.

“तिला शाहिद प्रचंड आवडायचा, पण त्यावेळी…”, मीरा राजपूतचा गंभीर खुलासा

त्यावर पुढे शाहिद आणि मीराने त्यांचे बेडरुम सिक्रेट शेअर केले. त्यावेळी शाहिद म्हणाला “मी कित्येक वेळा घरी काहीही कपडे न घालता झोपतो. त्यावर मीरा म्हणाली, तो अशा अवतारात झोपल्यानंतर त्याला फार आरामदायी वाटते. यावेळी शाहिद कपूरने करणसमोर त्याच्या पत्नीची भीती वाटते याची कबुलीही दिली.”

“माझी पत्नी मीरा ही रात्री तीन चादरी घेऊन झोपत असते. तसेच मला तिची खूप भीती वाटते. मी जेव्हा वॉशरुमसाठी जातो तेव्हा टॉयलेटची सीट वर करतो. पण ती खाली करणे विसरुन जातो. यावरुन ती मला खूप बडबड करते. तू माणूस आहेस की कोण? तुला शिस्त आहे की नाही?” असा किस्सा शाहिदने सांगितला.

लग्नानंतर वर्षभरातच शाहिदपासून वेगळं होण्याच्या विचारात होती पत्नी मीरा, एका गैरसमजामुळे…

दरम्यान वयाच्या फरकामुळे मीरा आधी शाहिदशी लग्न करण्यास तयार नव्हती, असे म्हटले जाते. मात्र त्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीने तिला समजवले आणि लग्नासाठी तयार केले. लग्नाच्या वेळी शाहिद हा ३४ वर्षांचा होता. तर मीरा ही २१ वर्षांची होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mira rajput once revealed some bedroom secrets with her husband shahid kapoor nrp